Advertisement

ठाण्यात एकाच वृद्धाश्रमातील १२ जणांना कोरोनाची लागण

ठाण्याच्या एका वृद्धाश्रमात तब्बल १२ ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे.

ठाण्यात एकाच वृद्धाश्रमातील १२ जणांना कोरोनाची लागण
SHARES

मुंबईसह राज्यभरात कोरोनाचा नवा प्रकार 'ओमिक्रॉन'मुळं भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. 'ओमिक्रॉन' या नव्या व्हेरियंटची तीव्रता लक्षात घेता नागरिकांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारनं पावलं टाकण्यास सुरूवात केली आहे. कोरोना विलगीकरण केंद्र, रुग्णालयांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. शिवाय नागरिकांनी कोरोना नियमांचं काठेकोरपणे पालन करण्याचं आवाहन ही केलं आहे. अशातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ठाण्याच्या एका वृद्धाश्रमात तब्बल १२ ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे.

मातोश्री असं त्या वृद्धाश्रमाचं नाव आहे. या वृद्धाश्रमातील ५५ ज्येष्ठ नागरिक आणि ७ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या रुग्णांवर ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती तेथील डॉक्टरांनी दिली. दरम्यान,  याआधी देखील या वृद्धश्रमातील अनेकांनी कोरोनाची लागण झाली.

कोरोनाला आळा घालण्यासाठी लसं घेण बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यानुसार या वृद्धश्रमातील ५९ जणांचं पुर्ण लसीकरण झाल्याचं समजतं.

मुंबईसह जगभरात कोरोनाचा नवा प्रकार ‘ओमिक्रॉन’ याची चर्चा सुरू आहे. कोरोनाचा हा नवा प्रकार दक्षिण आफ्रिकेत आढळुन आला असून, तेथूनच डोंबिवलीत आलेल्या एका ३२ वर्षीय प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. या प्रवाशाला उपचारार्थ कल्याणमधील आर्ट गॅलरी कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

कोरोनाचा नवा विषाणू ओमिक्रॉनचा संसर्ग रोखण्यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची माहिती नियमितरित्या मिळत राहावी, जेणेकरून त्यांच्यावर लक्ष ठेवता येईल व संसर्गाला वेळीच रोखण्यात यश मिळेल असं सांगितलं.

ज्या देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला आहे तेथील लाट सर्वात मोठी असून, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड, ऑस्ट्रिया या देशांमध्ये दर दिवशी ३० हजारांपेक्षा जास्त लोक करोनाग्रस्त झालेले आढळत आहेत. ओमिक्रॉन विषाणुचे ५० पेक्षा जास्त म्युटेशन आहेत.

सध्याच्या आरटीपीसीआर चाचणीत या व्हेरियंटची लागण असल्यास एस जिन आढणार नाही. सध्या तरी प्रतिबंधासाठी मास्क सर्वात जास्त आवश्यक आहे. केंद्र सरकारने १२ देशातल्या प्रवाशांची तेथून विमानात बसण्यापूर्वी ७२ तास अगोदर आरटीपीसीआर चाचणी आवश्यक केली असून इथं उतरल्यावर परत एकदा आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. तसंच ७ दिवसांसाठी विलगीकरण आवश्यक आहे.

परदेशातून येणारे प्रवासी थेट मुंबईत किंवा महाराष्ट्रातील इतर विमानतळांवर न उतरता देशात इतरत्र उतरून नंतर देशांतर्गत विमानसेवेने किंवा रस्ते आणि रेल्वे मार्गे आल्यास त्यांची तपासणी कशी करणार हा सध्याचा प्रश्न असून पंतप्रधानांना देखील यासंदर्भात अवगत करण्यात यावे यावर बैठकीत चर्चा झाली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशभरातील आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत विमानसेवांनी प्रवाशांची माहिती नियमितपणे एकमेकांना दिल्यास रुग्ण प्रवासी तसेच त्यांच्या संपर्कातील प्रवासी शोधणे सोपे जाईल असं सांगितलं.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा