नवी मुंबईत आता ऑनलाईन मिळणार कोरोना रुग्णांची माहिती

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

अँनटेजेन टेस्ट सुरू झाल्यानंतर नवी मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे. हे लक्षात घेता आता नवी मुंबई मनपा प्रशासन लवकरच कोरोनावर उपचार करणार्‍या रुग्णालयांची सर्व माहिती ऑनलाइन पाठवणार आहे. यासाठी मनपा ऑनलाईन माहिती प्रणालीही तयार करीत आहे.

नवी मुंबईत ९ ऑगस्टपर्यंत एकूण ३३ हजार ४५३ अँटीजन चाचण्या घेण्यात आल्या आहेत. तर ३६ हजार ६७० आरटीपीसीआर चाचण्या घेण्यात आल्या आहेत. नवी मुंबईत ९ ऑगस्टपर्त ७० हजार १२३ नागरिकांची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे.

हेही वाचा : मुंबईतील कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी ८९ दिवसांवर

ज्यामध्ये १८ हजार ४८१ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळले. २० हजार १७८ नागरिकांचा निकाल निगेटिव्ह आला. रुग्णांची संख्या वाढत असल्याचं पाहून मॉल बंद करण्यात आले आहेत. ५ ऑगस्टला खोलण्यात आलेले मॉल ६ ऑगस्टपासून बंद करण्यात आले.

सध्या नवी मुंबईतील ७४ टक्के कोरोना रुग्ण बरे होत आहेत. नवी मुंबईतील कोरोनाचे रुग्ण ३९ दिवसांत दुप्पट होत आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेनं (NMMC) स्वत:ची चाचणी प्रयोगशाळा सुरू केली आहे. यामध्ये दररोज १००० आरटी-पीसीआर चाचण्या करण्याची क्षमता आहे.


हेही वाचा

अरे बापरे ! राज्यात तासात ३९० जणांचा कोरोनाने मृत्यू, १२ हजार २४८ नवे रुग्ण

मुंबईत १०६६ नवे रुग्ण, दिवसभरात ४८ जणांचा कोरोनाने मृत्यू

पुढील बातमी
इतर बातम्या