Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत शनिवारी १५६ नवीन रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत शनिवारी (८ ऑगस्ट) १५६ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

पनवेल महापालिका हद्दीत शनिवारी १५६ नवीन रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत शनिवारी (८ ऑगस्ट) १५६ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये कामोठ्यातील ३, खांदा कॉलनी आणि कळंबोली येथील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

 शनिवारी १२१ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल महापालिका हद्दीतील  आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये कळंबोली-रोडपाली येथील ४०, कामोठ्यातील ४२, खांदा कॉलनीतील १०, खारघरमधील २९, पनवेलमधील १४, नवीन पनवेलमधील १५, तळोजा येथील ५ रुग्णाचा समावेश आहे.  

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण ७८७३ कोरोनाबाधित रूग्णांपैकी ६१९४ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून १८२ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे १४९७ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत.



हेही वाचा - 

मृत्यूदर शून्यावर आणणं हेच लक्ष्य- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

 मी काही डोनाल्ड ट्रम्प नाही- उद्धव ठाकरे




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा