Advertisement

नवी मुंबईत शुक्रवारी कोरोनाचे नवीन ३७६ रुग्ण

नवी मुंबईत शुक्रवारी कोरोनाचे नवीन ३७६ रुग्ण सापडले आहेत. तर ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबईत शुक्रवारी कोरोनाचे नवीन ३७६ रुग्ण
SHARES

नवी मुंबईत शुक्रवारी (७ आॅगस्ट) कोरोनाचे नवीन ३७६ रुग्ण सापडले आहेत. तर ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता १७ हजार ६९४ झाली आहे.  

शुक्रवारी बेलापूर ६७, नेरुळ ९४, वाशी ३६, तुर्भे २५, कोपरखैरणे ४५, घणसोली ४८, ऐरोली ४५, दिघामध्ये १६ नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात ६ ४९ जणांनी कोरोनावर मात केली आहे.  बेलापूर ९०, नेरुळ ७४, वाशी ९२, तुर्भे ४१, कोपरखैरणे १८२, घणसोली ९०, ऐरोली ७२ आणि दिघामधील ८ रुग्ण बरे झाले आहेत.  बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १३५५२ वर पोहोचली आहे.  तर मृतांचा आकडा ४५४ झाला आहे. नवी मुंबईत सध्या ३६८८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

नवी मुंबई कोरोनाची लागण मोठा व्यक्तीबरोबरच लहान मुलांना देखील होत असल्याने पालकवर्गातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. १ जून ते ३१ जुलै या दोन महिन्याच्या कालावधीत नवी मुंबईतील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या १३,१८३ इतकी असल्याचे तसेच त्यातील ६ ते १६ वयोगटातील ८१७ शाळकरी मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे नवी मुंबई महापालिकेकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे.


हेही वाचा

तर, मुंबईच काय जगातलं कुठलंही शहर तुंबेल, महापालिका आयुक्तांचा दावा

Mumbai Rains : पावसानं मोडला ४६ वर्षांचा रेकॉर्ड
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय