महापालिका मुख्यालयातील स्लॅबचा भाग कोसळला, कर्मचारी थोडक्यात बचावला

 मुंबई महापालिका मुख्यालयातील दुसऱ्या मजल्यावरील छपराचा भाग कोसळून उपायुक्तांच्या गाडीचं नुकसान झाल्यानंतर गुरुवारी याच इमारतीतील पहिल्या मजल्यावरील चिटणीस विभागाच्या छताचा काही भाग कोसळण्याची दुघर्टना घडली. पंख्याजवळील छताचा भाग कर्मचाऱ्याच्या टेबलावर पडला.  सुदैवानं यावेळी कर्मचारी बाजूला गेल्यामुळे तो बचावला. त्यामुळे महापालिका मुख्यालय इमारत आता कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित राहिली नसल्याचं दिसून येतं.

नुतनीकरणाकडं प्रशासनाची पाठ 

 पहिल्या मजल्यावरील चिटणीस विभागाच्या डिस्पॅच सेक्शनमधील छताचा भाग कोसळला. विभागातील लिपिक संदीप भोवड हे थोडक्यात बचावले. छताचा भाग त्यांच्या टेबलावर पडला. नेमके ते त्याचवेळी पेपर उचलण्यासाठी बाजूला गेले होते.  या घटनेनंतर मुख्यालय इमारतीचे प्रमुख अभियंता संजय सावंत यांनी जागेची पाहणी करून कोसळलेल्या भागाच्या आसपासचा धोकादायक भाग तोडून टाकला.महापालिका मुख्यालयाचं नुतनीकरण करताना, सर्वांत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या महापालिका चिटणीस विभागाच्या नुतनीकरणाकडं प्रशासनानं पाठ फिरवली आहे. या विभागाचं नुतनीकरण अद्यापही कागदावरच असून येथील कर्मचाऱ्यांना कोंदट वातावरणात काम करावं लागत आहे.


हेही वाचा -

विस्तारीत राणीबागेच्या भूखंडाची याचिका रद्द; मफतलाल कंपनीला दणका

गुडन्यूज! ठाण्यात दिव्यांगांसाठी १९० घरं


पुढील बातमी
इतर बातम्या