Advertisement

महापालिका मुख्यालय इमारतीचा छज्जा कोसळला, उपायुक्तांच्या गाडीचं नुकसान


महापालिका मुख्यालय इमारतीचा छज्जा कोसळला, उपायुक्तांच्या गाडीचं नुकसान
SHARES

मुंबई महापालिका मुख्यालय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील छज्जाचा भाग बुधवारी संध्याकाळी महापालिका अधिकाऱ्याचा गाडीवर कोसळला. सुदैवाने यात कुणीही जखमी झालं नाही. मात्र, या दुर्घटनेत उपायुक्त डॉ. किशोर क्षीरसागर यांच्या गाडीची काच फुटून नुकसान झालं.


कधी घडली घटना?

महापालिका मुख्यालय येथील दोन इमारतीमधील जागेत प्रवेशद्वार क्रमांक ५ जवळ डॉ. क्षीरसागर यांची कार उभी होती. संध्याकाळी ४.४५ वाजेच्या सुमारास इमारतीच्या लाकडी छज्जाची काही लाकडं थेट उपायुक्तांच्या गाडीवर पडून काचेचं नुकसान झालं. तसंच टपावरील भागही दबला गेला.


धोकादायक इमारत

सुदैवाने कार पार्क करून चालक बाहेर उभा होता. त्यामुळे त्याला कुठलीही दुखापत झाली नाही. परंतु अचानक झालेल्या दुर्घटनेमुळे एकच पळापळ झाली होती. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी हा परिसर बेरेकेट्स उभारून संरक्षित केला. महापालिका मुख्यालय इमारतीच्या देखभाल विभागाचे प्रमुख अभियंता संजय सावंत यांनी घटनास्थळी धाव घेऊन धोकादायक छज्जाचा भाग त्वरित काढून टाकण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.


या ठिकाणी गाडी उभी नसती तर कुणाच्याही डोक्यावर लाकूड पडून जीव गेला असता. महापालिका इमारतही सुरक्षित नसेल, तर या इमारतीची नेमकी कशी देखभाल केली जाते? असा सवाल भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी केला.



हेही वाचा-

जुन्या कागदपत्रांचं स्कॅनिंग करण्यात 'नेट स्पायडर' ठरला फेल!

वृक्ष प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय झाडांची छाटणी नाहीच- उच्च न्यायालय


 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा