Advertisement

गुडन्यूज! ठाण्यात दिव्यांगांसाठी १९० घरं

ठाणे महापालिका लवकरच 'बेसिक सर्व्हिसेस टू अर्बन पुअर' (बीएसयूपी) अंतर्गत ठाण्यात ९०० घरं बांधणार आहे. गरीबांसाठी बांधण्यात येणाऱ्या या १९० घरं महापालिकेनं दिव्यांगासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

गुडन्यूज! ठाण्यात दिव्यांगांसाठी १९० घरं
SHARES

हक्काच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्या ठाण्यातील बेघर दिव्यांगाना ठाणे महापालिकेनं खूशखबर दिली आहे. ठाणे महापालिका लवकरच 'बेसिक सर्व्हिसेस टू अर्बन पुअर' (बीएसयूपी) अंतर्गत ठाण्यात ६३२८ घरं बांधणार आहे. यापैकी १९० घरं महापालिकेनं दिव्यांगासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय  घेतला आहे. असा निर्णय घेणारी ठाणे महापालिका ही पहिली महापालिका आहे.


काय आहे 'बीएसयूपी'?

'बीएसयूपी'अंतर्गत देशभर गरीबांसाठी घरं बांधली जातात. या घरांच्या निर्मितीसाठी ४ भागांमध्ये निधी उपलब्ध होतो. त्यानुसार केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक महापालिका यांच्यासह लाभार्थी असा हा निधी उपलब्ध होतो. लाभार्थ्यांना अगदी माफक दरात १० टक्के रक्कम भरूत घरं उपलब्ध करून दिली जातात. त्यामुळं 'बीएसयूपी' योजना ही गरीबांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.


निधीतून काम

खरं तर मार्च २०१७ मध्येच केंद्र सरकारने ही योजना संपुष्टात आणली आहे. असं असलं तरी ठाण्यामध्ये या योजनेंतर्गत ज्या घरांची निर्मिती केली जात आहे त्या घरांचा निधी आधीच महापालिकेकडे आल्याने या निधीतूनच घरांची बांधणी सुरू आहे.



कधी होणार काम पूर्ण?

ठाणे पालिकेचे उपायुक्त मालविया यांनी दिलेल्या माहितीनुसार ठाणे महापालिका हद्दीत 'बीएसयूपी'अंतर्गत ६३२८ घरं बांधण्यात येणार आहेत. त्यातील ३८०८ घरं आतापर्यंत बांधून पूर्ण झाली असून २५२० घरांचं काम प्रगतीपथावर आहे. या ६३२८ घरांमधील ३५४४ घरं मूळ लाभार्थ्यांसाठी आहेत. त्यानुसार काही लाभार्थ्यांना घरांचं कायमस्वरूपी हस्तांतरण करण्यात आलं आहे. उर्वरित ज्या २५२० घरांचं काम सुरू आहे, ती घरं पुढच्या २ महिन्यांत, आॅक्टोबर २०१८ मध्ये पूर्ण होणार आहेत.

या प्रकल्पांतर्गत हाती घेण्यात आलेल्या ६३२८ घरांपैकी ५४२८ घरांसाठी निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळं उर्वरित ९०० घरांची निर्मिती महापालिकेला स्वत: च्या निधीतून करणार आहे. तर याच स्वखर्चातून बांधण्यात येणाऱ्या घरांपैकी १९० घरं दिव्यांगासाठी राखीव ठेण्यात आल्याचंही मालविया यांनी स्पष्ट केलं आहे.


विक्री लाॅटरीद्वारे

६३२८ घरांपैकी ३ टक्केप्रमाणे ही घरं राखीव ठेण्यात आली आहे. मुळात 'बीएसयूपी'मध्ये घर राखीव ठेवण्याची तरतूद नाही. पण या ९०० घरांची निर्मिती महापालिका स्वखर्चातून करणार असल्यानं १९० घरं दिव्यांगासाठी राखीव ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेत ठाणे महापालिकेनं दिव्यांगांना दिलासा दिला आहे. दरम्यान या घरांची विक्री लाॅटरीद्वारे करण्यात येणार आहे.



हेही वाचा-

Exclusive: सिडकोचं घर अडीच लाखांनी स्वस्त मिळणार!

म्हाडावर नामुष्की! १९ आॅगस्टची लाॅटरी २५ आॅगस्टवर



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा