Advertisement

Exclusive: सिडकोचं घर अडीच लाखांनी स्वस्त मिळणार!

३ लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्या आणि देशातलं पहिलं घर घेणाऱ्या विजेत्याला थेट अडीच लाखाच अनुदान मिळणार आहे. ही रक्कम विजेत्याच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे सिडकोच्या लॉटरीत पहिलं घर घेणाऱ्यांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे.

Exclusive: सिडकोचं घर अडीच लाखांनी स्वस्त मिळणार!
SHARES

सिडकोने नवी मुंबई परिसरातील १४ हजार ८३८ घरांची लॉटरी जाहीर केली आहे. अत्यल्प आणि अल्प गटासाठी एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने घरं उपलब्ध होणार असल्यानं इच्छुक खूश झालेत. पण थांबा! कारण खरी खूशखबर तर पुढं आहे. खूशखबर अशी की, ही घरं इच्छुकांना चक्क अडीच लाख रुपयांनी स्वस्त मिळणार आहेत.


केंद्राकडून अनुदान

लॉटरीतील अत्यल्प गटातील घरांच्या विजेत्यांना 'पंतप्रधान आवास योजने'खाली थेट अडीच लाखांच अनुदान केंद्राकडून मिळणार असल्याची माहिती सिडकोचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली. त्यामुळे १८ लाखाच्या घरासाठी विजेत्यांना १५ लाख ५० हजार इतकी रक्कम भरावी लागणार आहे. फक्त त्यासाठी एक महत्वाची अट अशी आहे की हे घर तुमचं पहिलं घर असायला हवं.


किती घरांचा समावेश?

सिडकोच्या लॉटरीतील १४ हजार ८३८ घरांचा समावेश पंतप्रधान आवास योजनेत करण्यात आला आहे. त्यामुळे पंतप्रधान आवास योजनेतील सर्व लाभ विजेत्यांना मिळणार आहेत. त्यानुसार ३ लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्या आणि देशातलं पहिलं घर घेणाऱ्या विजेत्याला थेट अडीच लाखाच अनुदान मिळणार आहे. ही रक्कम विजेत्याच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे सिडकोच्या लॉटरीत पहिलं घर घेणाऱ्यांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे.


क्रेडिट लिंक सबसिडी

अत्यल्प गटाबरोबरच अल्प गटातील विजेत्यांनाही सिडकोने मोठा दिलासा दिला आहे. अल्प गटातील घराच्या विजेत्यांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत क्रेडिट लिंक इंटरेस्ट सबसिडीचा लाभ घेता येणार आहे. विजेत्यांच पहिलं घर असेल तर विजेत्यांच्या वार्षिक उत्पन्नानुसार गृहकर्जात अनुदान मिळणार आहे. ही रक्कम २ लाख ३० हजार रुपयांपर्यंत जाते. त्यामुळे अल्प गटातील विजेत्यांनाही सव्वा दोन लाखांनी घर स्वस्त मिळणार आहे हे विशेष.


चांगल्या प्रतिसादाची अपेक्षा

सिडकोच्या लॉटरी तील सर्व घर पंतप्रधान आवास योजनेत असल्यानं आणि गरिबांसाठीच मोठ्या संख्येन घर उपलब्ध करून देण्यात आल्याने या लॉटरीला चांगला प्रतिसाद मिळेल, असं म्हटलं जात आहे.


घरं महारेराच्या कक्षेत

महारेरा कायद्याच्या कक्षेत म्हाडा, सिडको आणि एसआरए ही येतं. त्यामुळे सिडकोच्या लॉटरीतील घरांची नोंदणी महारेरात करण्यात आली आहेत. ही घरं महरेराच्या कक्षेत आल्याने घरांचा ताबा वेळेत मिळाला नाही, ओसी नसेल वा इतर कोणत्याही तक्रारी या घराबाबत असतील, तर त्याविरोधात महारेराकडे दाद मागता येणार असल्याची माहिती मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष अॅड. शिरीष देशपांडे यांनी दिली.हेही वाचा-

सिडकोची १४,८३८ घरांची लॉटरी; २५ हजार नवीन घरंही

म्हाडावर नामुष्की! १९ आॅगस्टची लाॅटरी २५ आॅगस्टवरRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा