RBIचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना कोरोनाची लागण

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

RBIचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना कोरोनाची लागण झाली आहे. दास यांनीच ट्विट करून याची माहिती दिली आहे. कोरोनाची लक्षणे नाहीत, प्रकृतीही चांगली आहे, सध्या मी क्वारंटाइन झालो आहे अशी माहितीही त्यांनी दिली. जे कुणी माझ्या संपर्कात आले आहेत. त्या सगळ्यांनी आपली टेस्ट करून घ्यावी असंही त्यांनी सांगितलं.

दास हे क्वारंटाइन झाल्याचे पुढे आल्यानंतरर बँकेच्या कामकाजात अडथळे निर्माण होतील. असे वाटू लागले असतानाच, दास यांनीच बँकेचं कामकाज नियमित सुरूच राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. बँकेचं कुठलंही काम अडणार नाही त्याची सगळी व्यवस्था करण्यात आली आहे. मी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कायम संपर्कात आहे आणि राहिन असंही त्यांनी सांगितलं. गेल्या काही दिवसांपासून दास हे सतत बैठकांमध्ये व्यस्त होते. कोरोनाचं संकटामुळे अर्थव्यवस्थेला तडाखा बसल्यामुळे आरबीआयवर सध्या कामाचा प्रचंड ताण आहे.

हेही वाचाः-तब्बल ५६ तासांनी सिटी सेंटर मॉलमधील आग नियंत्रणात

दरम्यान राज्यात अनलॉक ४ ला सुरवात झाली असताना, दिवसभरात कोरोनाचे ६०५९ नवे रुग्ण सापल्याने आरोग्य विभागाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. तर दिवसभरात ११२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. एकाच वेळी नोंदवल्या गेलेल्या एवढ्या मोठ्या संख्येमुळे राज्यातील एकूण कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या आता १६,४५,०२० इतकी झाली आहे. यात उपचार घेऊन आतापर्यंत डिस्चार्ज मिळालेल्या २५,१८,०१६ जणांचा आणि आतापर्यंत मृत्यू झालेल्या ४३,२६४ जणांचाही समावेश आहे. तसेच, एकूण संख्येत (१६,४५,०२०) राज्यात विद्यमान स्थिती प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या १,४०,४८६ रुग्णांचाही समावेश आहे.

हेही वाचाः-महापालिका कर्मचाऱ्यांना बोनस किती? मुख्यमंत्री व पालिका आयुक्तांच्या बैठकीत होणार निर्णय

पुढील बातमी
इतर बातम्या