नक्की लाॅकडाऊन की अनलाॅकडाऊन ते सांगा, ४ दिवसात पोलिसांनी २ हजार गाड्या केल्या जप्त

पोलिसांच्या या कारवाईवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नेमकं लाँकडाऊन आहे की अनलाँकडाऊन आहे असा प्रश्न नागरिक आता विचारू लागले आहेत.

नक्की लाॅकडाऊन की अनलाॅकडाऊन ते सांगा, ४ दिवसात पोलिसांनी २ हजार गाड्या केल्या जप्त
SHARES

मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सर्वत्र लाॅकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे मुंबईच्या रस्त्यावरील वाहनांची वरदळ पूर्णतहा थांबली होती. मात्र मुंबईत कोरोना वायरस जसा जसा नियंत्रणात येऊ लागला. तसे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनलाँकडाऊनच्या घोषणा केल्या मात्र आजही नागरिक अनलाॅकडाऊनबाबत संभ्रमात आहेत. तर दुसरीकडे अत्यावश सेवे व्यतिरिक्त घराबाहेर फिरणाऱ्यांना मुंबई पोलिसांच्या वाहतूक पोलिसांनी दणका दिला आहे. अवघ्या ४ दिवसात पोलिसांनी २ हजार जणांच्या दुचाकी जप्त केल्या आहेत.

हेही वाचाः- तब्बल ८८ वर्षानंतर मुंबई  पोलिस दिसले घोड्यावर

मुंबईवरील कोरोना जरी नियंत्रणात आला असला. तरी संकट अद्याप संपलेले नाही. तरीही नागरिक आता बिनदिक्कत मुंबई च्या रस्त्यावर फिरत असल्याने, नियम मोडणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. मुंबईच्या वाहतूक पोलिसांनी मंगळवारी ५९२, बुधवारी ६३३, गुरूवार व शुक्रवार ५५० गाड्या अशा एकून ४ दिवसात २ हजार गाड्या जप्त केल्या आहेत. मात्र पोलिसांच्या या कारवाईवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नेमकं लाॅकडाऊन आहे की अनलाॅकडाऊन आहे असा प्रश्न नागरिक आता विचारू लागले आहेत. पोलिस करत असलेल्या कारवाई दरम्यान अनेकदा नागरिक आणि पोलिसांमध्ये खटकेही उडत आहे.

हेही वाचाः- दीड दिवसांच्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप

मुंबईवरील कोरोनाचे संकट पाहता पोलिसांनी नागरिकांना खबरदारी आणि अनलाँकडाऊनचे नियम पाळण्याचे आवाहन केलं आहे.  या नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांवर आजही पोलिस कारवाई करत आहेत. मुंबईत रविवारी सार्वजनिक ठिकाणी विनाकारण गर्दी केल्या प्रकरणी १४ गुन्हे नोंदवलेले आहेत. तर तोंडाला मास्क न वापरणाऱ्या १९ जणांवर कारवाई केली आहे. तर मुंबईच्या रस्त्यावरही पहिल्यासारखी गर्दी होऊ लागल्याने गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी नाकाबंदी लावून कारवाई  करण्यास सुरूवात केली आहे
Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा