स्टंटबाजांचा पुन्हा मुंबईच्या रस्त्यांवर धुमाकूळ; ११ दुचाकी जप्त

वांद्रे-वरळी सी लिंकसह वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर रात्रीच्या वेळेस स्टंटबाजी पुन्हा सुरू झाल्याची माहिती वांद्रे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शनिवारी पोलिसांनी 'शब-ए-बारात'च्या दिवशी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावला होता. यावेळी वेगात दुचाकी चालवणाऱ्यांवर पोलिस कारवाई करत होते.

स्टंटबाजांचा पुन्हा मुंबईच्या रस्त्यांवर धुमाकूळ; ११ दुचाकी जप्त
SHARES

 मुंबईच्या रस्त्यांवर वेगात गाडी चालवत स्टंटबाजी करणाऱ्या १४ जणांवर शनिवारी वांद्रेच्या वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. यात एका रिक्षाचाही समावेश असून पोलिसांनी ११ दुचाकी जप्त केल्या आहेत. 


रात्रीच्या वेळेस स्टंटबाजी

वांद्रे-वरळी सी लिंकसह वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर रात्रीच्या वेळेस स्टंटबाजी पुन्हा सुरू झाल्याची माहिती वांद्रे पोलिसांना मिळाली होती.  त्यानुसार शनिवारी पोलिसांनी  'शब-ए-बारात'च्या दिवशी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावला होता. यावेळी वेगात दुचाकी चालवणाऱ्यांवर पोलिस कारवाई करत होते.  त्यात एका रिक्षा चालकाचाही समावेश होता.  रात्री बारा ते पहाटेपर्यंत स्टंटबाजी करणाऱ्या १४ तरुणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्याविरोधात चार गुन्ह्यांची नोंद करुन नंतर त्यांना अटक करण्यात आली. यावेळी पोलिसांनी ११ बाईक जप्त केल्या.


न्यायालयीन कोठडी

यातील रिक्षा चालक समीर मुमजात अहमद शेख त्याची रिक्षा नागमोडी वळण घेताना एका टायरवर रिक्षा चालवत होता. त्याच्याविरुद्ध नंतर रॅश ड्रायव्हिंगप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी एक रिक्षा जप्त केली आहे. या सर्वांना रविवारी दुपारी वांद्रे येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.हेही वाचा-

श्रीलंकेतील बॉम्बस्फोटानंतर मुंबईच्या सुरक्षेत वाढ

बेनामी ६ कोटी रुपयांना अद्याप वाली नाही
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा