Advertisement

तब्बल ५६ तासांनी सिटी सेंटर मॉलमधील आग नियंत्रणात

मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर मॉलला लागलेली रविवारी पहाटे ५ वाजता म्हणजेच तब्बल ५६ तासांनी पूर्णत: नियंत्रणात आली.

तब्बल ५६ तासांनी सिटी सेंटर मॉलमधील आग नियंत्रणात
SHARES

मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर मॉलला लागलेली रविवारी पहाटे ५ वाजता म्हणजेच तब्बल ५६ तासांनी पूर्णत: नियंत्रणात आली.  याबाबत अग्निशमन दलानं माहिती दिली असून, शनिवारी आग नियंत्रणात आल्यानंतर प्रत्यक्षात संपूर्ण इमारत थंड करण्याची प्रक्रिया रविवारी पहाटे ५ वाजता पूर्ण झाली. या मॉलच्या दुसऱ्यामजल्यावरील एका दुकानातील मोबाइलच्या बॅटरीने पेट घेतला आणि काही क्षणात हा संपूर्ण मजला आगीच्या भक्ष्यस्थानी पडला, असा निष्कर्ष प्राथमिक पाहणीतून काढण्यात आला आहे.

मुंबईच्या नागपाडा परिसरात असलेल्या सिटी सेंटर मॉलला गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली होती. या मॉलमध्ये मोबाइल आणि अन्य इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची मोठ्या प्रमाणावर दुकानं आहेत. त्यामुळं आगीनं काही क्षणातच अक्राळविक्राळ रूप धारण केलं. मॉलमधील ३रा मजलाही आगीच्या विळख्यात सापडला होता. आगीच्या ज्वाळांचा भडका आणि धूर यामुळे अग्निशमन करणाऱ्या जवानांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता.

शनिवारी या ही आग विझविण्यात आली असून, त्यासाठी एकूण २५४ टँकर पाणी वापरण्यात आले आहेत. आग नियंत्रणात आणण्यासाठी तैनात असलेले अग्निशामक चंद्रशेखर तुकाराम सावंत (५५) यांना शनिवारी धुरामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळं तत्काळ त्यांना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत जखमी झालेल्या अग्निशमन दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या ६ वर पोहोचली आहे.

काही दिवसांपूर्वी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. आदित्य ठाकरे यांनी सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नसून आपले शूर जवान तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं आग विझवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं त्यांनी म्हटलं. हेही वाचा -

शिवसेना मुंबईचा लचका महाराष्ट्र द्वेष्ट्यांना तोडू देणार नाही- उद्धव ठाकरे

‘या’ विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात ५ टक्के जागांवर प्रवेश राखीव


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा