Advertisement

महापालिका कर्मचाऱ्यांना बोनस किती? मुख्यमंत्री व पालिका आयुक्तांच्या बैठकीत होणार निर्णय

काही दिवसांपूर्वी संघटनांची पालिका आयुक्तांबरोबर बैठक झाली असून त्यात २० हजार रुपयांपर्यंत सानुग्रह अनुदान मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

महापालिका कर्मचाऱ्यांना बोनस किती? मुख्यमंत्री व पालिका आयुक्तांच्या बैठकीत होणार निर्णय
SHARES

दरवर्षी दिवाळीनिमित्त मुंबई महापालिकेच्या (bmc) कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस (bonus) दिला जातो. गतवर्षी पालिका कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपयांचं सानुग्रह अनुदान देण्यात आलं होतं. मात्र, यंदा कामगार संघटनांच्या समन्वय समितीनं सुरुवातीला ४० हजार रुपयांपर्यंत सानुग्रह अनुदान देण्याची मागणी केली होती. काही दिवसांपूर्वी संघटनांची पालिका आयुक्तांबरोबर बैठक झाली असून त्यात २० हजार रुपयांपर्यंत सानुग्रह अनुदान मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या या बोनसबाबत सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) आणि महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल (bmc) यांच्यात बैठक होणार आहे.

यंदा ४० हजार रुपये बोनसची मागणी कामगार संघटनांनी केली आहे. त्यामुळं कामगारांना नक्की किती बोनस मिळणार हे या बैठकीत समजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदा महापालिकेच्या अर्थसंकल्पात १५३ कोटी १४ लाख रुपयांची तरतूद सानुग्रह अनुदानासाठी करण्यात आली आहे. यातून प्रत्येक कर्मचारी आणि कामगाराला १७ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळू शकेल, मात्र कामगार संघटनांच्या समन्वय समितीनं सुरुवातीला ४० हजार रुपयांपर्यंत सानुग्रह अनुदान देण्याची मागणी केली होती.

काही दिवसांपूर्वी संघटनांची महापालिका आयुक्तांबरोबर बैठक झाली असून त्यात २० हजार रुपयांपर्यंत सानुग्रह अनुदान मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. महापालिकेच्या कर्मचारी आणि कामगारांनी कोरोना काळात केलेल्या कामाचा विचार करून यंदा सानुग्रह अनुदान वाढवून देण्याची मागणी संघटनांनी केली आहे. तर दुसरीकडं यावर्षी लॉकडाऊमुळं पालिकेचं उत्पन्न कमी झालं आहे. त्यामुळं नक्की किती सानुग्रह अनुदान मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.



हेही वाचा -

शिवसेना मुंबईचा लचका महाराष्ट्र द्वेष्ट्यांना तोडू देणार नाही- उद्धव ठाकरे

‘या’ विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात ५ टक्के जागांवर प्रवेश राखीव


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा