आज मध्यरात्रीपासून मालाडच्या मढ भागात टोटल लॉकडाऊन

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई उपनगरातही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होतोना दिसत आहे. मालाड आणि बोरिवली हे उपनगरामधील सर्वाधिक बाधित क्षेत्र म्हणून समोर येत आहे. हे पाहता गुरुवार रात्रीपासून मालाडमधील मध भागात लॉकडाऊनचं काटेकोरपणे पालन केलं जाईल.

सहाय्यक आयुक्त पी / उत्तर वॉर्ड यांनी यासंदर्भात एक परिपत्रक काढलं आहे.यात म्हटलं आहे की, ११ जून 2020 च्या मध्यरात्री ते १५ जून २०२० च्या मध्यरापर्यंत मढ परिसरात काटेकोरपणे बंद पाळण्यात येणार आहे. केवळ वैद्यकीय दुकानंच उघडण्यास परवानगी आहे. सदर आदेशाचं उल्लंघन केल्यास भारतीय दंड विधान कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येईल.

दरम्यान गुरुवारी मुंबईत कोरोनाचे एकूण रुग्ण वाढून ५४ हजार ०८५ इतकी झाली आहे. मुंबईत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या  हजार ९५४ पर्यंत गेली आहे.


हेही वाचा

वाहतुकीच्या कोडींवर पर्याय; मुंबई पोलिसांची ‘सॅगवे’ने गस्त

क्रॉफर्ट मार्केट परिसरात भीषण आग, महापौरांचा उंदरावर आरोप...

पुढील बातमी
इतर बातम्या