ट्रॅफिक पोलिसांशी वाद घालाल तर...

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

यापुढे वाहतूक पोलिसांशी धतींगबाजी करताना सावध व्हा! कारण आता सर्व ट्रॅफिक पोलिसांना वाय फाय कॅमेरे पुरवण्यात येतील. त्याद्वारे तुम्ही त्यांच्याशी जे काही संभाषण किंवा कोणतीही अरेरावी कराल तर ती रेकॉर्ड होऊन सरळ त्यांच्या कंट्रोल रूमला जाईल. मग तुमच्यावर कायदेशीर कारवाई करताना तोच पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाईल.

सुरुवातीला शहरात 100 कॅमेऱ्यांची चाचणी घेतली जाईल. या कॅमेऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे रेकॉर्ड केलेला व्हिडिओ क्लिप एडिट करता येणार नाही. जेणेकरुन छेडछाडीची शक्यता कमी असेल, असे वाहतूक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

सध्याच्या घडीला, वाहतूक विभागाकडे हायड्रोलिक व्हॅन असून त्यात कॅमेरा आणि मेगा फोन आहेत. एखादे वाहन टोईंग करताना त्यावरून घोषणा केली जाते.

हेही वाचा - 

ट्रॅफिक विभागात भ्रष्टाचार नाही - एसीबी

वाहतूक पोलिसाला मारहाण


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

पुढील बातमी
इतर बातम्या