वाहतूक पोलिसाला मारहाण

 Borivali
वाहतूक पोलिसाला मारहाण

बोरिवली - वाहतूक पोलिसाला मारहाण करण्यात आल्याची घटना पुन्हा एकदा घडली आहे. बोरिवली पश्चिमेत रेल्वेस्टेशनसमोरच्या एसव्ही रोड सिग्नलवर उभे असलेले वाहतूक पोलीस विष्णू जोशी यांना तीन दुचाकीस्वारांनी मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. मात्र अन्य दोन तरुण फरार झाले.

गुरुवारी आरोपी बुलेटवरून तीन जणांना घेऊन जात होता. तसेच त्याने हेल्मेटसुद्धा घातले नव्हते. दरम्यान पोलिसांनी अडवले असता त्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. याबाबत माहिती देताना सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र ढवळे (वाहतूक) यांनी सांगितले की "बोरिवली पोलिसांनी कलम 353 आणि 279 अन्वये गुन्हा दाखल करत कार्तिक शेट्टीला अटक केली आहे".

Loading Comments