ट्रॅफिक विभागात भ्रष्टाचार नाही - एसीबी


ट्रॅफिक विभागात भ्रष्टाचार नाही - एसीबी
SHARES

मुंबई - वाहतूक पोलीस विभागात कोट्यवधींचा भ्रष्टाचार असल्याचा आरोप पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील टोके यांनी केला आहे. यावर टोके यांनी स्टींग ऑपरेशन करून उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय.

प्रत्येक गुन्ह्यासाठी ट्रॅफिक पोलिसांचे रेटकार्ड ठरलेलं आहे, असा सनसनाटी दावाही टोकेंनी उच्च न्यायालयात केला होता. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने अतिरिक्त पोलीस महासंचालक एसीबी यांना मुंबई आणि इतर वाहतूक विभागातील भ्रष्टाचाराची चौकशी करुन अहवाल पुढील 6 आठवड्यात सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सुनिल टोके यांच्या याचिकेवर एसीबीने अहवाल सादर केला.

या अहवालानुसार एसीबीने 29 जणांची चौकशी करून जबाब नोंदवला. या चौकशीत मुंबई ट्रॅफिक पोलीस दलात भ्रष्टाचार नसल्याचे उत्तर एसीबीनं सादर केलंय. त्यावर याचिकाकर्त्यांनी दिलेल्या व्हिडिओ क्लिप्स तपासून अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सरकारी वकिलांना दिलेत.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा