• 'वाहनचालकाकडे गाडीची कागदपत्रं मागू नयेत'
  • 'वाहनचालकाकडे गाडीची कागदपत्रं मागू नयेत'
SHARE

मुंबई - वाहनचालकाकडे गाडीची कागदपत्रं मागू नयेत, असे आदेश वाहतूक पोलीस सहआयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिले आहेत. मुंबईतील वाहतूक पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करणं आणि मुंबईतील वाहतुकीमध्ये शिस्त आणणं अपेक्षित असून त्यांनी आरटीओतर्फे देण्यात येणारी पीयुसी, विमा, ग्रीन टॅक्ससारख्या कागदपत्रांची तपासणीकरिता वाहनधारकांकडे मागणी करू नये, असा कार्यालयीन आदेशच मुंबई पोलिसांनी काढला आहे.

1 जानेवारी 2017 पासून मुंबई पोलिसांतर्फे ई-चलन मशीनद्वारे कारवाई पद्धत अंमलात आणली आहे. वाहतुकीच्या नियमांचं पालन करणं आणि त्याचप्रमाणे कॅशलेस व्यवहार होणं अपेक्षित असताना वाहतूक विभागातील अधिकारी आणि अंमलदारांकडून त्यांची पारदर्शकपणे अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याचं या आदेशात म्हटलं आहे. वाहतूक पोलीस आरटीओची कागदपत्र मागत असल्यानं वाहन चालक आणि ट्रॅफिक पोलीस यांच्यात वाद निर्माण होत असल्यानं जनमानसात पोलिसांची प्रतिमा मलीन होत असल्याचंही या आदेशात म्हणण्यात आलं आहे. त्यामुळे आरटीओची कोणतीही कागदपत्रं वाहतूक पोलिसांनी तपासणीसाठी मागू नयेत, असे स्पष्ट आदेश सहपोलीस आयुक्त वाहतूक विभाग मिलिंद भांबरे यांनी दिले आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या