‘या’ गुन्ह्यात रॅपर बादशाहची पोलिसांनी केली ४ तास चौकशी

मुंबई गुन्हे शाखेच्या सेंट्रल इंटेलिजन्स युनिटकडून सोशल मीडियावर गैरप्रकारे फेक फॉलोवर वाढवणाऱ्या टोळीचा काही दिवसांपूर्वी पर्दाफाश केला होता. या प्रकरणात अनेक बड्या कलाकारांची नावे पुढे आली होती. या प्रकरणात पोलिसांनी आता फास आवळण्यास सुरूवात केली आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी बाॅलीवूडमधील काही जणांची चौकशी करत जबाबही नोंदवण्यात आले. त्यात आता प्रसिद्ध रॅपर बादशाह याचीही गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ४ तास चौकशी केल्याचे समोर आले आहे.  

हेही वाचाः- हँगिंग गार्डन परिसरात लँडस्लाईड, 'हे' रस्ते वाहतुकीसाठी ३ महिने बंद

बाॅलीवूडमध्ये अनेक कलाकारांनी सोशल मडियावर पोस्ट करताच, काही क्षणात त्यावर लाईकचा पाऊस पडतो. मात्र नागरिक खरोखर त्यांच्या पोस्ट लाईक करतात की, कुणी फेक फाॅलोअर्स त्यांना प्रसिद्धीसाठी मदत करतो. याचा पोलिस तपास करत असताना. रॅपर बादशाहने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ अपलोड केला होता, ज्याच्यावर लाखोंच्या संख्येत त्याला लाइक्स आणि व्युज काही क्षणात मिळाले. कुठल्या दिवशी हजारोंच्या संख्येने तर एखाद्या दिवशी लाखोंच्या संख्येने या व्हिडिओवर लाइक्स मिळाले आहेत. बादशाहाकडून गुन्हे शाखेला  प्रश्नांची उत्तरे अपेक्षित आहेत, जी त्यांना या तपासामध्ये मदत करतील. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख हे स्वतः या प्रकरणामध्ये बारकाईने लक्ष ठेवून आहेत, या प्रकरणामध्ये काही पीआर एजन्सिज आहेत, जे असे फेक लाईक्स आणि व्युज काही बड्या व्यक्तींना पुरवण्याचं काम करत असतात. या एजन्सीजवर सुद्धा क्राइम ब्रांचची करडी नजर आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत दोघांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचाः- आवाजावरुन करणार कोरोना चाचणी, मुंबई महापालिकेचा प्रयोग

मुंबई क्राईम ब्रांचने या प्रकरणात काही दिवसांपूर्वी काशीफ मनसूरला अटक केली होती. सिव्हिल इंजिनियर असलेला काशीफने अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात फेक फाॅलोअर्स बनवल्याचे चौकशीत पुढे आले आहे. www.amvsmm.com या वेबसाईट वरुन काशिफ मनसूर हा गोरख धंदा चालवत होता. इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक अशा विविध सोशल मीडियावर सिनेमा, स्पोर्ट्स आणि इतर क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचे प्रोफाईल हॅक करून फेक लाईक्स आणि फॉलोवर्स पुरवण्याचं काम करत होता.

पुढील बातमी
इतर बातम्या