Advertisement

हँगिंग गार्डन परिसरात लँडस्लाईड, 'हे' रस्ते वाहतुकीसाठी ३ महिने बंद

मलबार हिल इथल्या हँगिंग गार्डन जवळील बीजी खेर रोडवरील एका तटबंदीचा काही भाग कोसळला आणि रस्त्याला तडे गेले. त्यामुळे ३ महिन्यासाठी वाहतूक अशी वळवण्यात आली आहे...

हँगिंग गार्डन परिसरात लँडस्लाईड, 'हे' रस्ते वाहतुकीसाठी ३ महिने बंद
SHARES

गेले ३ दिवस मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे यावर्षी देखील मुंबईची तुंबई झाली. दक्षिण मुंबईत अनेक ठिकाणी झाडं कोसळली. कांदिवली भागात दरड कोसळल्याची घटना देखील घडली. तर अशीच एक घटना गुरुवारी सकाळी दक्षिण मुंबईतील हँगिंग गार्डनजवळ घडली आहे. त्यामुळे या भागातील काही रस्ते वाहतुकिसाठी बंद करण्यात आले आहेत.

हँगिंग गार्डन जवळील बीजी खेर रोडवरील एका तटबंदीचा काही भाग कोसळला आणि रस्त्याला तडे गेलेत. दरड कोसळल्यानं आणि तडे गेल्यानं केम्प्स कॉर्नरकडे जाणारा रस्ता, पाण्याच्या पाईपलाईन खराब झाल्या आहेत. डोंगराच्या उतारावरील सुमारे १५ झाडे उपटून गेली. सुरक्षा भिंत आणि रस्त्यावरील तडे पुन्हा दुरुस्त करेपर्यंत या परिसरातील रस्ते बंद करण्यात आले आहेत.

'हे' रस्ते बंद

रस्त्याच्या कामासाठी हँगिंग गार्डन ते कॅम्प्स कॉर्नर ट्रॅफिक सिग्नलपर्यंतचा रस्ता ३ महिन्यांसाठी बंद असेल. याशिवाय कॅम्पस कॉर्नर ते पेडर रोडला जाणारा ब्रिज एक किंवा तीन दिवसांसाठी बंद असेल. या घटनेनंतर वाहतूक पोलिसांनी पेडर रोडच्या दोन्ही दिशेकडील वाहतुक कॅम्पस कॉर्नरपासून चौपाटीपर्यंत वाहनांसाठी बंद केली आहे. भूस्खलन झालेला रिज रोडही बंद करण्यात आला आहे.

हेही वाचा : मुंबईकरांसाठी गुड न्यूज! मुंबईला पाणीपुरवठा करणारे आणखी एक धरण भरले


'हा' आहे पर्यायी मार्ग 

दक्षिण मुंबईहून महालक्ष्मीच्या दिशेनं येणाऱ्या वाहनांना कॅम्प्स कॉर्नर उड्डाणपुलाच्या खालून जाता येईल. त्यानंतर हाजी अली मार्गे ताडदेव-नाना चौक- ओपेरा हाऊस असा रस्ता वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.”असं एका वाहतूक पोलिस अधिकाऱ्यानं सांगितलं.

उत्तर-दिशेनं येणारे वाहनचालक विल्सन कॉलेजजवळील मार्गाचा वापर करू शकतात. ऑपेरा हाऊसच्या मार्गानं  नाना चौक- ताडदव सर्कल - ताडदेव रोड - हाजी अली या मार्गाचा वापरू शकतात. वाहनचालकांना मार्गदर्शन करण्यासाठी अतिरिक्त वाहतूक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.


परिसरातील पाणी पुरवठेवर परिणाम

महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी घटनास्थळी भेट दिली. ते म्हणाले की, या घटनेनंतर या मर्गावरील वाहतुक वळवण्यात आली आहे. तिथली दगड-माती आणि झाडं साफ करण्याचं काम सुरू आहे. परिसरातील ४ पाण्याच्या पापईलाईन फुटल्या आहेत. त्यामुळे बिजी खेर रोड परिसरातील पाण्याच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. या परिसरातील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी दुसरी पर्यायी व्यवस्था करण्यात येईल. पण त्यासाठी काही दिवस जातील. तोपर्यंत सोसायटीजमध्ये टँकरच्या मदतीनं पाणीपुरवठा केला जाईल.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील गुरुवारी इथं भेट दिली. त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील उपस्थि होते.   


हेही वाचा

तर, मुंबईच काय जगातलं कुठलंही शहर तुंबेल, महापालिका आयुक्तांचा दावा

Mumbai Rains : पावसानं मोडला ४६ वर्षांचा रेकॉर्ड

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा