Advertisement

आवाजावरुन करणार कोरोना चाचणी, मुंबई महापालिकेचा प्रयोग

पुढील आठवड्यापासून नेस्कोच्या जंबो केअर सेंटरमधील संशयित आणि कोरोना रूग्णांच्या आवाजाची तपासणी केली जाणार असल्याचं मुंबई महापालिकेने सांगितलं आहे.

आवाजावरुन करणार कोरोना चाचणी, मुंबई महापालिकेचा प्रयोग
SHARES

आता चक्क आवाजावरुन कोरोना चाचणी केली जाणार आहे. मुंबई महापालिकेकडून हा नवा प्रयोग करण्यात येणार आहे. कोरोना संसर्गाच्या तपासासाठी अँटिजन आणि अँटिबॉडी तपासणीनंतर मुंबई महापालिकेने आता आवाजाची तपासणी करण्याचाही निर्णय घेतला आहे. यामध्ये ध्वनी लहरींवरुन कोरोना पॉझिटिव्ह किंवा निगेटीव्ह असल्याचं निदान केलं जाऊ शकतं, अशी माहिती मुबई महापालिकेने दिली आहे.


पुढील आठवड्यापासून नेस्कोच्या जंबो केअर सेंटरमधील संशयित आणि कोरोना रूग्णांच्या आवाजाची तपासणी केली जाणार असल्याचं मुंबई महापालिकेने सांगितलं आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर आवाज बदलतो असं वैद्यकीय तज्ज्ञांचे निरिक्षण आहे. या विषाणूचा स्वरयंत्रणेवर कशा प्रकारचा परिणाम होतो, कोरोना झाल्याची लक्षणे असतील तर आवाजावर परिणाम होऊ शकतो का, या सर्व दृष्टींनी विशेष अभ्यास केला जाणार असल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

या चाचणीमध्ये केवळ ३० मिनिटांमध्ये कोरोना विषाणूची लागण झाली आहे की नाही हे समजणार आहे. या चाचणीत जे पॉझिटिव्ह आढळतील त्यांचे आरटीपीसआर चाचणीने निदान पक्के केलं जाणार असल्याचंही महापालिकेने सांगितलं आहे.

ही संकल्पना अमेरिका आणि इस्त्रायल सारख्या देशांमध्ये वापरली जात आहे. एखाद्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणं दिसतात तेव्हा त्यांना श्वासनाचा त्रास होतो. या सर्व प्रक्रियेमध्ये फुफ्फुसांच्या स्नायूंवर प्रभाव पडतो. स्नायूंना सूज येते. त्यामुळे आवाजही बदलतो. आवाजावर परिणाम झाल्यामुळे त्यात बदल होतो आणि याच बदललेल्या आवाजाला मोजण्यात येते आणि त्यातून त्या व्यक्तिला कोरोना झाला की नाही हे तपासलं जाऊ शकतं.



हेही वाचा

तर, मुंबईच काय जगातलं कुठलंही शहर तुंबेल, महापालिका आयुक्तांचा दावा

Mumbai Rains : पावसानं मोडला ४६ वर्षांचा रेकॉर्ड




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा