फेक फाँलोओर्स प्रकरणी दोन बड्या मार्केटिंग कंपन्यांच्या अडचणीत वाढ, १० सेलिब्रिटी रडारवर

या दोन कंपन्यांनी आतापर्यंत ३० हजार बनावट प्रोफाईल बनवल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी आतापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

फेक फाँलोओर्स प्रकरणी दोन बड्या मार्केटिंग कंपन्यांच्या अडचणीत वाढ, १० सेलिब्रिटी रडारवर
SHARES

फेक फॉलोअर्स प्रकरणात गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या तपासात अनेक नवनवीन खुलासे समोर येऊ लागले आहेत. अनेक बड्या हस्ती या प्रकरणात अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात असताना, त्यात १० सेलिब्रिटींची नावे देखील आहेत. आतापर्यंत  दोन मार्केटिंग कंपन्याच्या अधिकाऱ्यांचे जबाब पोलिसांनी आतापर्यंत नोंदवलेले आहेत. या दोन कंपन्यांनी आतापर्यंत ३० हजार बनावट प्रोफाईल बनवल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी आतापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचाः- मुंबई पोलिस गस्त घालणार ‘स्पोर्ट्स बाईक’वरून

ऑनलाईन फॉलोअर्स पुरवण्याच्या माध्यमातून डाटा चोरीचा प्रकारही घडत असल्याचा संशय आहे. याप्रकरणी शुक्रवारी गुन्हे शाखेने एका मार्केटींग कंपनीचे चीफ एक्झिकेटीव्ह ऑफिसर(सीईओ) व चीफ ऑपेंटीग ऑफीसर(सीओओ) यांचा जबाब गुन्हे शाखेने नोंदवला. प्रकरणात अनेक तांत्रिक बाबी आहेत. त्या अनुषंगाने जबाब नोंदवण्यात आला आहे, असे सूत्रांनी सांगितले. साक्षीदार म्हणून त्यांचा याप्रकरणी जबाब नोंदवण्यात आला असून अद्याप त्यांचा कोणताही सहभाग आढळला नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. १ जुलैलै प्रसिद्ध गायिका भूमी त्रिवेदी यांच्या नावाने बनावट इस्टाग्राम खाते तयार करण्यात आल्याची तक्रार पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडे केली होती. अशा व्यक्ती इतर व्यक्तींशी संपर्क साधून त्यांचे इस्टाग्राम व फेसबुक प्रोफाईल खोट्या पद्धतीने सक्रिय करण्यासाठी संपर्क साधत असतात. त्यामुळे आयुक्तांनी याप्रकरणी गुन्हे शाखेच्या गुप्तवार्ता विभागाला तपासाचे आदेश दिले होते. याप्रकणी बांगूर नगर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी कुर्ला येथील गौरीशंकर नगर येथून तरूणाला अटक केली होती. याप्रकरणी तपास करणा-या विशेष पथकाने आणखी दोन कंपन्यांची ओळख पटवली असून त्याही समाज माध्यमांवर बनावट प्रभावके(इन्फ्लूएन्सर) तयार करत असल्याचा संशय होता.

हेही वाचाः- मुंबईत १ हजार ९० नवे रुग्ण, दिवसभरात ५२ जणांचा मृत्यू

त्याप्रकरणी अखेर सीआययू पोलिसांनी आरोपी काशीफ मन्सूरला अटक केली. आरोपीने आतापर्यंत २५ हजार ऑर्डरनुसार फॉलोअर्स पुरवल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीने आतापर्यंत दोन कोटी ३० लाख बनावट फॉलोअर्स पुरवल्याचेही एका अधिका-याने सांगितले. याप्रकरणी तपासात दोन दिग्गज अभिनेत्रींसह बांधकाम व्यावसायिक, नृत्यदिग्दर्शक, फॅशन डिझायनर, स्पोर्टस कंपनी अशा १० सेलेब्रीटी रडावर आल्या आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा