बनावट फोलोअर्स वाढवणं पडणार महागात, गृहमंत्र्यांनी दिला हा इशारा

फेक फॉलोअर्स प्रकरणात दोन दिग्गल अभिनेत्रीं नावे पुढे आल्यानंतर आता आणखी दिग्गज व्यक्तींची नावे रडावर आली आहेत

बनावट फोलोअर्स वाढवणं पडणार महागात, गृहमंत्र्यांनी दिला हा इशारा
SHARES

 स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्याचा फोटो किंवा बनावट खात्याचा वापर करून, त्यावर बनावट फोलोअर्सच्या मदतीने पैसे कमवले जात असल्याचे सीआययूच्या कारवाईतून पुढे आले. या प्रकरणाची गंभीर दखल आता गृहमंत्र्यांनी घेतली असून असा ‘पीआर कंपनी’ची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख दिलेले आहे. काही दिवसांपूर्वी केलेल्या सीआययूच्या कारवाईत फेक फॉलोअर्स प्रकरणात दोन दिग्गल अभिनेत्रीं नावे पुढे आल्यानंतर आता आणखी दिग्गज व्यक्तीही रडावर आली आहेत. त्यात बांधकाम व्यावसायिक, नृत्यदिग्दर्शक, फॅशन डिझायनर, स्पोर्टस कंपनी यांचा समावेश असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

हेही वाचाः- राज्यातील १२१ मदरशांसाठी १.८० कोटी रुपये निधी मंजूर - नवाब मलिक

सोशल मिडिया  हे माध्यम आता फक्त कमणूकीसाठी न राहता पैसे कमवण्याचे माध्यम झाले आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर, यावर लाईक, कमेंट आणि फाॅलोअर जास्तीत जास्त तयार केल्यास त्यामागे पैसे मिळतात. एका विशिष्ठ बेकायदेशीर अॅपच्या माध्यमातून हे फाँलोअर्स वाढवले जातात. या प्रकरणात ही नेमका तसाच प्रकार उघडकीस आला आहे. प्रसिद्ध गायिका भूमी त्रिवेदीच्या नावाने आरोपी अविनाशने इन्टावर बनावट प्रोफाइल तयार केले होते. त्याद्वारे चित्रपटातील काही व्यक्तींकडे काम मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे तिला समजले. या घटनेची गंभीर दखल घेत तिने पोलिस आयुक्त परमबिर सिंग भेट घेत हा प्रकार लक्षात आणून दिला. आयुक्तांच्या आदेशानंतर बांगूर नगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवत हा गुन्हा गुन्हे गुप्तवार्ता विभागा च्या पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. त्यानुसार पोलिसांनी कुर्ला गौरीशंकर नगर परिसरातून अविनाशला अटक केली. न्यायालयाने त्याला १७ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी तपास करणा-या विशेष पथकाने आणखी दोन कंपन्यांची ओळख पटवली असून त्याही समाज माध्यमांवर बनावट प्रभावके(इन्फ्लूएन्सर) तयार करत असल्याचा संशय होता. त्याप्रकरणी अखेर पोलिसांनी आरोपी काशीफ मन्सूरला अटक केली. आरोपीने आतापर्यंत २५ हजार ऑर्डरनुसार फॉलोअर्स पुरवल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीने आतापर्यंत दोन कोटी ३० लाख बनावट फॉलोअर्स पुरवल्याचेही एका अधिका-याने सांगितले. याप्रकरणी तपासात दोन दिग्गज अभिनेत्रींसह बांधकाम व्यावसायिक, नृत्यदिग्दर्शक, फॅशन डिझायनर, स्पोर्टस कंपनी अशा १० सेलेब्रीटी रडावर आल्या आहेत.

हेही वाचाः-आयपीएलच्या तारखांची घोषणा, 'या' तारखेला होणार पहिला सामना

 इन्स्टाग्राम, टीकटॉक, फेसबूक या समाज माध्यमांवर बनावट प्रोफाईलसाठी सॉफ्ट वेअरच्या मदतीने कोट्यावधी प्रोफाईल तयार करण्यात येतात. त्या माध्यमातून प्रोफाईलवरून फॉलोअर्स बनावट पद्धतीने वाढवता येऊ शकतात. त्यामुळे त्या प्रोफाईलचा प्रभाव पडू शकतो. त्यासाठी विशिष्ट सॉफ्टवेअर(बॉट्स) तयार करण्यात आले होते. सोशल मीडियाच्या यंत्रणेत फेरफार करून हा प्रकार केला जातो. भारतात प्रथमच अशा यंत्रणेशी संबंधीत व्यक्तीला अटक करण्यात आले आहे.अशी १०० पेक्षा जास्त पोर्टल सध्या अस्तित्त्वात आहेत. याप्रकरणी पोलिसांनी ५४ हून अधिक सोशल मीडियावर माग काढला आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा