सोशल मिडियावर फॉलोअर्स वाढवणं पडू शकतं महागात

इस्टाग्राम व फेसबुक प्रोफाईल खोट्या पद्धतीने सक्रिय करण्यासाठी संपर्क साधत असतात. त्यामुळे आयुक्तांनी याप्रकरणी गुन्हे शाखेच्या गुप्तवार्ता विभागाला तपासाचे आदेश दिले होते

सोशल मिडियावर फॉलोअर्स वाढवणं पडू शकतं महागात
SHARES

सोशल मिडियावर फॉलोअर्स वाढवण्यासाठी काही कंपन्या चुकीच्या पद्धतीने बनावट अकाऊट उघतात. काही दिवसांपूर्वी सीआययूच्या पोलिसांनी अशाच एका टोळीचा पर्दाफाश केला. यातील एका आरोपीला नुकतीच पोलिसांनी अटक केली. काशीफ मन्सूर (३०) असे या आरोपीचे नाव आहे. त्या आरोपींच्या चौकशीत त्याने ऑर्डरनुसार ३० लाख फॉलोअर्स वाढवल्याची कबूली पोलिसांना दिली आहे.

हेही वाचाः- Amitabh Bahachan: अमिताभ यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह, लवकरच मिळणार डिस्चार्ज

जोगेश्वरीच्या पश्चिम परिसरात काशीफ अमृत नगरमध्ये राहतो. त्याला बुधवारी सायंकाळी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला अटक केली. १ जुलैला प्रसिद्ध गायिका भूमी त्रिवेदी यांच्या नावाने बनावट इस्टाग्राम खाते तयार करण्यात आल्याची तक्रार पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडे केली होती. अशा व्यक्ती इतर व्यक्तींशी संपर्क साधून त्यांचे इस्टाग्राम व फेसबुक प्रोफाईल खोट्या पद्धतीने सक्रिय करण्यासाठी संपर्क साधत असतात. त्यामुळे आयुक्तांनी याप्रकरणी गुन्हे शाखेच्या गुप्तवार्ता विभागाला तपासाचे आदेश दिले होते. याप्रकणी बांगूर नगर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी कुर्ला येथील गौरीशंकर नगर येथून तरूणाला अटक केली होती. याप्रकरणी तपास करणा-या विशेष पथकाने आणखी दोन कंपन्यांची ओळख पटवली असून त्याही समाज माध्यमांवर बनावट प्रभावके(इन्फ्लूएन्सर) तयार करत असल्याचा संशय होता.

हेही वाचाः-  तर तिथेच राजीनामा दिला असता- उदयनराजे भोसले

त्याप्रकरणी अखेर पोलिसांनी आरोपीला अटक केली. अभिनेत्री कोयना मित्रानेही नुकतीच बनावट इन्स्टाग्राम व यू ट्यूब खात्याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली आहेत. हे प्रकरणही गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाकडे वर्ग करण्यात आले आहे


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा