Advertisement

Amitabh Bahachan: अमिताभ यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह, 'ही' तर निव्वळ अफवा

बाॅलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे अमिताभ बच्चन यांना ११ जुलैच्या रात्री नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

Amitabh Bahachan: अमिताभ यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह, 'ही' तर निव्वळ अफवा
SHARES

बाॅलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे अमिताभ बच्चन यांना ११ जुलैच्या रात्री नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. (amitabh bachchan might get discharged from nanavati hospital after covid 19 test negative)

अमिताभ यांच्या सोबतच त्यांचे चिरंजीव आणि अभिनेता अभिषेक बच्चन देखील कोरोना पाॅझिटिव्ह आल्याने दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अभिषेकची तब्येत देखील ठिक असल्याचं सांगण्यात येत आहे. एबीपी न्यूजने याबाबतचं वृत्त दिलं आहे. परंतु हे वृत्त निराधार असल्याचा खुलासा खुद्द अमिताभ यांनीच केला आहे.

हेही वाचा - एक प्रवास अमिताभचा आणि आपलाही!

कोरोनाची सौम्य लक्षणे दिसू लागल्याने या दोघांनाही ११ जुलैच्या रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु दोघांनाही एकाच वेळेस डिस्चार्ज मिळेल की नाही हे आताच सांगता येत नाही. मात्र येत्या एक ते दोन दिवसांत दोघांनाही डिस्चार्ज मिळू शकेल.  

अभिषेक याची पत्नी ऐश्वर्या राय बच्चन आणि त्यांची ८ वर्षांची मुलगी आराध्या ‘जलसा’ बंगल्यात होम क्वारंटाईन होत्या. परंतु ताप, घशात खवखव आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानंतर या दोघींनाही १७ जुलैच्या रात्री नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऐश्वर्या आणि आराध्या या दोघींचीही प्रकृती ठिक आहे. परंतु या दोघींना रुग्णालयातून केव्हा सोडण्यात येईल, याबाबत अद्याप कुठलीही माहिती मिळू शकलेली नाही.  

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा