ज्येष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या जलसाबाहेर रक्तपात, दोघांना अटक

एक चाहता अमिताभ यांच्याभेटीसाठी त्यांच्या ‘जलसा’ या बंगल्याबाहेर मागीत ५ दिवसांपासून झोपत होता. त्याच्यावर गुरूवारी तीन मद्यपींनी जिवघेणा हल्ला करत त्याला लुटले.

ज्येष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या जलसाबाहेर रक्तपात, दोघांना अटक
SHARES

अमिताभ बच्चन यांचा चाहता वर्ग फक्त देशभरातच नाही तर जगभरात आहे. त्यांची एक अदाकारी पाहण्यासाठी आजही त्यांच्या बंगल्याबाहेर त्याचे चाहते गर्दी करत असतात. असाच एक चाहता अमिताभ यांच्याभेटीसाठी त्यांच्या ‘जलसा’ या बंगल्याबाहेर मागीत ५ दिवसांपासून झोपत होता. त्याच्यावर गुरूवारी तीन मद्यपींनी जिवघेणा हल्ला करत त्याला लुटले. या प्रकरणात मोठ्या शिताफीने  जुहू पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. संजय उर्फ राजेंद्र उर्फ खिडकी गोपी खारवा (२५), सूरेश काजी खारवा (२०) अशी या दोन आरोपींची नावे आहेत. या दोघांवर अशा प्रकारच्या ८ गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती जुहू पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचाः- अमिताभ बच्चन यांना कोरोनाची बाधा, नानावटी रुग्णालयात दाखल

सध्या कोविड१९ मुळे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि त्याचा मुलगा अभिषेक बच्चन यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पालिकेने त्याच्या जलसा हा बंगला प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषीत केला आहे. मात्र दोनच दिवसांपूर्वी अमिताभ यांच्या बंगल्याबाहेर मोठा रक्तपात घडला होता. या प्रकरणी जुहू पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला होता.  या प्रकरणातील तक्रारदार अकील रफिक अहमद (३५) हा मूळचा उत्तरप्रदेशच्या बरेलीतील ताईपुरी पोलिस चौकी परिसरात राहणारा आहे. तो प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चनचा मोठ फॅन असून ३० जून रोजी घरातल्यांना न सांगताच तो मुंबईला आला होता. त्या दिवसांपासून तो दररोज अमिताभ यांच्या बंगल्याबाहेर झोपत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. दरम्यान ४ जुलैच्या मध्यरात्री अकील हा अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याच्या समोरील भारती आरोग्य निधी हाँस्पिटलच्या फुटपाथवर झोपला होता. त्यावेळी त्या ठिकाणी राजेंद्र , विकास, रमेश हे तीन आरोपी त्या ठिकाणी आले. अकीलला एकटे पाहून त्यांनी त्याला जबरदस्ती दारू पिण्यासाठी चल असा आग्रह केला. याला अकिल याने विरोध केल्याने अकिल आणि तीन आरोपींमध्ये शाब्दीक वाद झाला. त्यावरून तीनही आरोपींनी अकीलवर चाकूने हल्ला केला. या हल्यात अकिलच्या पोटावर, छातीवर आणि उजव्या हाताच्या दंडावर हल्ला केल्याने तो त्यात जखमी झाला असून त्याच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचाः- अमिताभ बच्चन यांच्यानंतर अभिषेक बच्चन कोरोना पॉझिटिव्ह

 या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अंधेरी पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अंधेरी पोलिसांना या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेत हा गुन्हा पुढील तपासासाठी त्यांनी जुहू पोलिसांकडे वर्ग केला आहे. जुहू पोलिसांनी सीसीटिव्हीच्या माध्यमातून  संजय उर्फ राजेंद्र उर्फ खिडकी गोपी खारवा (२५), सूरेश काजी खारवा (२०)  या दोन आरोपींना  अटक केली आहे. हे दोघेही सराईत आरोपी असून त्याच्या विरोधात खार, बोरिवली रेल्वे पोलिस ठाणे,  वांद्रे रेल्वे पोलिस ठाणे येथे ८ जबरी चोरीच्या गुन्ह्यांची नोंद असल्याचे जुहू पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

संबंधित विषय