Advertisement

ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या नानावटी रुग्णालयात दाखल

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि मुलगी आराध्या बच्चन (aaradhya bachchan) यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या नानावटी रुग्णालयात दाखल
SHARES

अभिनेते अमिताभ बच्चन (amitabh bachchan), अभिषेक बच्चन (abhishek bachchan) यांच्यानंतर आता अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि मुलगी आराध्या बच्चन (aaradhya bachchan) यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईच्या नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

ऐश्वर्या रायमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं दिसून आली आहेत. तिला हलका ताप आला आहे. त्यानंतर ऐश्वर्यासह आराध्यालाही रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं गेलं. तर अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यावर आधीपासूनच नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

११ जुलैला रात्री बीग बींना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचं देखील समोर आलं. त्यामुळे त्यांना नानावटी रुग्णालयात (Nanavati Hospital) दाखल करण्यात आलं होतं. त्यांची कोरोना टेस्ट केल्यानंतर कोरोनाचं निदान झालं. त्यानंतर अभिषेक बच्चनचे रिपोर्टही पॉझिटिव्ह आले. यानंतर ऐश्वर्या राय, जया बच्चन आणि आराध्या यांचीही तातडीनं कोरोना चाचणी करण्यात आली.

१२ जुलैला ऐश्वर्या आणि आराध्या यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर जया बच्चन यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा, त्यांचा मुलगा अगस्त्या आणि मुलगी नव्या यांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. ऐश्वर्या आणि आराध्याला होम क्वारंटाइन करण्यात आलं होतं.



हेही वाचा

अभिनेत्री रेखा यांचा कोरोना चाचणी करण्यास नकार

रीया चक्रवर्तीची गृहमंत्री अमित शाहांकडे सीबीआय चौकशीची मागणी

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा