Advertisement

इन्स्टाग्रामवर महिलेची बदनामी, बनावट प्रोफाइलद्वारे महिलेच्या नावे अश्लील मेसेज

इन्स्टाग्रामला ई-मेल करून संबंधीत खात्याचा आयपी एड्रेसची मागणी करण्यात आली आहे. तो प्राप्त झाल्यानंतर आरोपीविरोधात कारवाई करण्यात येईल, असे एका अधिका-याने सांगितले.

इन्स्टाग्रामवर महिलेची बदनामी, बनावट प्रोफाइलद्वारे महिलेच्या नावे अश्लील मेसेज
SHARES
Advertisement
इन्स्टाग्राम या समाज माध्यमावरील एका महिलेचे प्रोफाईल छायाचित्र दुस-या बनावट खात्यावर वापरत त्यावर अश्लिल टिप्पणी करणा-याविरोधात भोईवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  यापकरणी पोलिसांनी अधिक तपास करत आहेत.

परळ परिसरात राहणारी एका महिला इन्स्टाग्रामवर सक्रिय होती. इन्स्टाग्रामवर  तिचा एक मित्र आहे. तर या मित्राने बानवट खाते उघडुन या महिलेचा फोटो त्यावर अपलोड केला. तर एवढेच नाही या खात्यावर अश्लिल मजकुर देखील ठेवला आहे. मात्र हे खाते महिलेच्या एका नातेवाइकाच्या निदर्शनास येताच, त्यांनी याबाबत महिलेला कळविले.

त्यानुसार, या महिलेने तत्काळ भोईवाडा पोलिस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला. तर याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. या महिलेने तिच्या एका मित्रावर संशय व्यक्त केला असून त्याचे नाव प्राप्त झाले आहे. याबाबत इन्स्टाग्रामला ई-मेल करून संबंधीत खात्याचा आयपी एड्रेसची मागणी करण्यात आली आहे. तो प्राप्त झाल्यानंतर आरोपीविरोधात कारवाई करण्यात येईल, असे एका अधिका-याने सांगितले. आरोपीने या महिलेच्याच प्रोफाईलवरील छायाचित्राचा वापर बनावट खाते तयार करण्यासाठी वापरले आहे. महिलेची बदनामी करण्याच्या उद्देशाने आरोपीने हा प्रकार केल्याचा संशय आहे
संबंधित विषय
Advertisement