म्हणून सोनू सूदचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मानले आभार

लाँकडाऊच्या काळात कोरोनाच्या भितीने अनेक कामगारांनी गाड्या उपलब्ध नसल्यामुळे चालतच गावाची वाट धरली. त्यावेळी त्या सर्व सामान्यांच्या मदतीसाठी सोनू सूद हा धावून आला. प्रशासनाच्या मदतीने त्याने लाखो स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या निश्चित स्थळी पोहचवले.

म्हणून सोनू सूदचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मानले आभार
SHARES

लाॅकडाऊन सुरू झाल्यापासून अभिनेता सोनू सूद हा मुंबईत अडकलेल्या सर्व सामान्य नागरिक, कामगार वर्गासाठी जमेल तितकी मदत करतोय, त्याचे हे कार्य अविरत सुरूच आहे. नुकतेच त्याने नागरिकांच्या संरक्षणासाठी सदैव तैनात असलेल्या पोलिसांना २५ हजार 'फेस शिल्ड' दिलेल्या आहेत. त्याची ही मोलाची मदत पाहून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 'ट्विटर'च्या माध्यमातून सोनू सूदचे आभार मानले आहेत.

हेही वाचाः- महापालिकेनं अखेर नाल्यावरील 'तो' फलक हटवला

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे, सुरूवातीच्या म्हणजेच लाॅकडाऊच्या काळात कोरोनाच्या भितीने अनेक कामगारांनी गाड्या उपलब्ध नसल्यामुळे चालतच गावाची वाट धरली. त्यावेळी त्या सर्व सामान्यांच्या मदतीसाठी  सोनू सूद हा धावून आला. प्रशासनाच्या मदतीने त्याने लाखो स्थलांतरीत  मजुरांना त्यांच्या निश्चित स्थळी पोहचवले. सोनूच्या या कामाचे कौतुक सर्व स्तरावरून होऊ लागले. मात्र काहींनी त्यांच्या कामावर टिका करत राजकारण करण्याचा ही प्रयत्न केला. मात्र सोनू सूदने त्याकडे दुर्लक्ष करत आपले काम सुरूच ठेवले होते. दरम्यान नुकतेच सोनू सूदने पोलिसांसाठी २५ हजार फेस शिल्ड पोलिसांना दिले. त्याचे कारण असे की, मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढत आहे. अनलाॅकडाऊन असल्याने अनेक नागरिक हे आता रस्त्यावर उतरू लागले आहे. त्यामुळे पोलिस हे नागरिकांच्या थेट संपर्कात येत असल्यामुळे कोरोना बाधित पोलिसांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे.

हेही वाचाः- अखेर डहाणू ते चर्चगेट लोकल रुळावर, अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना दिलासा

त्यामुळे नक्कीच फेस शिल्ड ही छोटीशी मदत असली. तरी अन्य काही सुविधा द्यायच्या झाल्यास ते ही देण्याचा प्रयत्न नक्की करीन, असे सोनूने प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.गुरूवारी सोनूने गृहमंत्र्याची भेट घेत या फेस शिल्डचे वाटप केले. त्यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोनूच्या या योगदानाबद्दल कौतुक करत त्याचे आभार मानले.   

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा