‘या’ अभिनेत्रीच्या नावानेही बनावट इन्स्टाग्राम-यूट्यूब खाते

फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर, यावर लाईक, कमेंट आणि फाॅलोअर जास्तीत जास्त तयार केल्यास त्यामागे पैसे मिळतात. एका विशिष्ठ बेकायदेशीर अॅपच्या माध्यमातून हे फाँलोअर्स वाढवले जातात.

‘या’ अभिनेत्रीच्या नावानेही बनावट इन्स्टाग्राम-यूट्यूब खाते
SHARES

सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध व्यक्तींच्या नावाने बनावट प्रोफाईल तयार करून सोशल मार्केंटिंग करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा गुन्हे गुप्त वार्ता विभाग(CIU)ने काही दिवसांपूर्वीच पर्दाफाश केला. या प्रकरणाचा निपटारा होऊन आठवडा नाही उलटत तोच आता अभिनेत्री कोयना मित्राचे ही अशा प्रकारे बनावट खाते सुरू असल्याची तक्रार तिने पोलिसांना केली आहे. या प्रकरणी दोन कंपन्या या पोलिसांच्या रडारवर आल्या आहेत.  

हेही वाचाः- नालासोपारा स्थानकात संतप्त प्रवाशांकडून आंदोलन

सोशल मिडिया (Social media ) हे माध्यम आता फक्त कमणूकीसाठी न राहता पैसे कमवण्याचे माध्यम झाले आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर, यावर लाईक, कमेंट आणि फाॅलोअर जास्तीत जास्त तयार केल्यास त्यामागे पैसे मिळतात. एका विशिष्ठ बेकायदेशीर अॅपच्या माध्यमातून हे फाँलोअर्स वाढवले जातात. या प्रकरणात ही नेमका तसाच प्रकार उघडकीस आला आहे. प्रसिद्ध गायिका भूमी त्रिवेदीच्या नावाने आरोपी अविनाशने इन्टावर बनावट प्रोफाइल तयार केले होते. त्याद्वारे चित्रपटातील काही व्यक्तींकडे काम मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे तिला समजले. या घटनेची गंभीर दखल घेत तिने पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Commissioner of Police Parambir Singh ) भेट घेत हा प्रकार लक्षात आणून दिला. आयुक्तांच्या आदेशानंतर बांगूर नगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवत हा गुन्हा गुन्हे गुप्तवार्ता विभागा(सीआययू)च्या पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. त्यानुसार पोलिसांनी कुर्ला (Kurla) गौरीशंकर नगर परिसरातून अविनाशला अटक केली. न्यायालयाने त्याला १७ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचाः- गणेशोत्सवासाठी विशेष रेल्वेगाडी सोडण्याची प्रवाशी संघटनांची मागणी

भूमीप्रमाणेच कोयना मित्राच्या नावानेही बनावट इन्स्टाग्राम व यूट्यूब अकाउंट प्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली आहे. ओशिवरा पोलिसांकडे याबाबत तक्रार करण्यात आली असून तक्रारीनुसार कोयना मित्रा ऑफिशिअल नावाने बनावट इन्स्टाग्राम खाते बनवण्यात आल्याचे मित्राकडून कळाले. तसेच माझे संकेतस्थळावरील छायाचित्रांचा वापर त्यासाठी करण्यात येत आहे. ज्यावेळी कोयनाने त्याची तपासणी केली असता तिलाही मित्राने दिलेली माहिती खरी असल्याचे आढळले. त्यात चौकशीसाठी साहिल खान नावाच्या व्यक्तीचा ईमेल देण्यात आला आहे. अशा कोणत्याही व्यक्तीला आपण ओळखत नसल्याचे कोयनाने तक्रारीत म्हटले आहे. या इन्स्टाग्राम खात्याचे ३६ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. या खात्याच्या माध्यमातून माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रकार होऊ शकतो, अशी मला भीती वाटतेय, असे कोयनाने तक्रारीत नमुद केले आहे. याशिवाय युट्युवरही अशाच पदधतीने कोयनाच्या नावाने खाते तयार करण्यात आले असून त्यात अश्लील चित्रफीती आहेत. हे प्रकरण आता गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाकडे सोपवण्यात आले आहे.संबंधित विषय