सोशल मिडियावर हजारो फाॅलोअर्स असणारी ‘ती’ निघाली ‘तो’ पोलिसांकडून एकाला अटक

प्रसिद्ध गायिका भूमि त्रिवेदीने दिलेल्या तक्रारी पोलिस तपासात हा सर्व प्रकार उघडकीस

सोशल मिडियावर हजारो फाॅलोअर्स असणारी ‘ती’ निघाली ‘तो’  पोलिसांकडून एकाला अटक
SHARES

सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध व्यक्तींच्या नावाने बनावट प्रोफाईल तयार करून  सोशल मार्केंटिंग करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा गुन्हे गुप्त वार्ता विभागाने पर्दाफाश केला आहे. प्रसिद्ध गायिका भूमि त्रिवेदीने दिलेल्या तक्रारी पोलिस तपासात हा सर्व प्रकार उघडकीस आल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी अविनाश दवडे (२१) या तरुणाला कुर्ला परिसरातून अटक केली आहे.

हेही वाचाः- मुंबईत ९६९ नवे रुग्ण, ७० जणांचा दिवसभरात मृत्यू

सोशल मिडिया हे माध्यम आता फक्त कमणूकीसाठी न राहता पैसे कमवण्याचे माध्यम झाले आहे.  फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब,  ट्विटर, यावर लाईक, कमेंट आणि फाॅलोअर जास्तीत जास्त तयार केल्यास त्यामागे पैसे मिळतात. एका विशिष्ठ बेकायदेशीर अॅपच्या माध्यमातून हे फाँलोअर्स वाढवले जातात. या प्रकरणात ही नेमका तसाच प्रकार उघडकीस आला आहे. प्रसिद्ध गायिका भूमी त्रिवेदीच्या नावाने आरोपी अविनाशने इन्टावर बनावट प्रोफाइल तयार केले होते. त्याद्वारे चित्रपटातील काही व्यक्तींकडे काम मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे तिला समजले. या घटनेची गंभीर दखल घेत तिने पोलिस आयुक्त परमबीर सिंह भेट घेत हा प्रकार लक्षात आणून दिला. आयुक्तांच्या आदेशानंतर बांगूर नगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवत हा गुन्हा गुन्हे गुप्तवार्ता विभागा(सीआययू)च्या पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. त्यानुसार पोलिसांनी कुर्ला गौरीशंकर नगर परिसरातून अविनाशला अटक केली. न्यायालयाने त्याला १७ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचाः- विनाकारण फिरू नका, लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांची ९१ हजार वाहने जप्त

 तपासा दरम्यान आरोपी हा अविनाश हा  ‘फॉलोवर्स कार्ट’ या संकेतस्थळासाठी काम करतो. एका पीआर कंपनीत काम करत असताना. याला या अँपबाबत समजले होते. झटपट पैसे कमवण्याच्या नादात अभिषेकने हा गोरख धंदा सुरू केला. हा आंतरराष्ट्रीय फसवणूक करणा-या रॅकेटचा भाग असल्याचे निष्पन्न झाले. हे रॅकेट समाज माध्यमांवर कोट्यावधी बनावट ओळखी व बनावट फॉलोअर्स, बनावट कमेंट, बनावट लाईक्स, बनावट व्ह्यूज तयार करून शकतात. आरोपी अविनाशनेही आतापर्यंत इन्स्टाग्राम, टीकटॉक, फेसबूक या समाज  माध्यमांवर १७६ बनावट प्रोफाईल बनावून पाच लाखांहून अधिक बनावट फॉलोअर्स तयार केले होते. त्या माध्यमातून प्रोफाईलवरून फॉलोअर्स बनावट पद्धतीने वाढवता ही येऊ शकतात. त्यामुळे त्या प्रोफाईलचा प्रभाव पडू शकतो. त्यासाठी विशिष्ट सॉफ्टवेअर(बॉट्स) तयार करण्यात आले होते. सोशल मीडियाच्या यंत्रणेत फेरफार करून हा प्रकार  त्याने  केला होता. भारतात प्रथमच अशा यंत्रणेशी संबंधीत व्यक्तीला अटक करण्यात आले आहे.अशी १०० पेक्षा जास्त पोर्टल सध्या अस्तित्त्वात आहेत. याप्रकरणी पोलिसांनी ५४ हून अधिक सोशल मीडियावर माग काढला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा