विनाकारण फिरू नका, लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांची ९१ हजार वाहने जप्त

२२ मार्च ते १३ जूलै या कालावधीत कलम १८८ नुसार १,७६,४१८ गुन्हे नोंद झाले असून ३०,३३० व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.

विनाकारण फिरू नका, लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांची ९१ हजार वाहने जप्त
SHARES

राज्यासह मुंबईत कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी अत्यावश्यस सेवा या दिवस रात्र प्रयत्न करत असताना. अनेक ठिकाणी नागरिक लॉकडाऊनचे उल्लंघन करत विनाकारण फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा बेजबाबदार नागरिकांवर पोलिसांनी कलम १८८ नुसार  १ लाख ७६ हजार गुन्हे दाखल केले आहेत. तर आतापर्यंत ९१ हजार १२७ जणांची वाहे पोलिसांनी जप्त केली असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

 हेही वाचाः- अभिनेता वृषभ शहाची उल्लेखनीय कामगिरी

राज्यात कोरोना संसर्गाचा आलेख हा दिवसेंदिवस वाढत असताना, कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. मात्र अद्याप काही जणांना परिस्थितीचं गांभीर्यच कळालेलं दिसत नाही. अशा बेजबाबदार नागरिकांमुळे कोरोना फोफावण्यात मदत होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी अशा बेशिस्त नागरिकांवर कारवाई करण्यास सुरूवात केली. त्यानुसार राज्यात  लॉकडाऊनच्या  काळात म्हणजेच २२ मार्च ते १३ जूलै  या कालावधीत  कलम १८८ नुसार  १,७६,४१८ गुन्हे नोंद झाले असून ३०,३३० व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. अनेकदा कारवाई करताना पोलिसांवर हल्ल्याच्या घटनाही घडल्या आहेत.  अशा हल्लेखोरांविरुद्ध  पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. पोलिसांवर  हल्ला होण्याच्या ३१२ घटना घडल्या असून त्यात ८७० व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. तर परप्रांतिय नागरिकांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी पोलिसांनी आतापर्यंत ५ लाख ९६ हजार ४७० ई-पासचे वाटप केलेले आहे.

हेही वाचाः- Bakra Eid: बकरी मंडीचा आग्रह नको- उद्धव ठाकरे

या  लॉकडाऊनच्या काळात नागरिक सर्वाधिक मदतीसाठी पोलिसांच्या १०० नंबर या नियंत्रण कक्षाकडे फोन करून मदत मागत आहेत. अशा १लाख ७ हजार मदतीचे फोन आले असून त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली.  तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे अशा ८०२ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. अशी माहिती देशमुख यांनी दिली.

 पोलिस कोरोना कक्ष

 कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने   मुंबईतील ४५ पोलीस व ३ अधिकारी अशा एकूण ४८, पुणे ३, सोलापूर शहर ३, नाशिक ग्रामीण ३,नाशिक शहर १, ए.टी.एस. १, मुंबई रेल्वे ४, ठाणे शहर ५ व ठाणे ग्रामीण १ व १ अधिकारी, जळगाव ग्रामीण १,पालघर २, रायगड २,जालना SRPF १ अधिकारी , जालना ग्रामीण १,अमरावती शहर १ wpc, उस्मानाबाद १,नवी मुंबई  SRPF १ अधिकारी,औरंगाबाद शहर १,नवी मुंबई १ अशा ८२ पोलिस बांधवांचा मृत्यू झाला. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. सध्या १४७ पोलीस अधिकारी व १०६५ पोलीस कोरोना  बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


Read this story in English
संबंधित विषय