Advertisement

मुंबईत ९६९ नवे रुग्ण, ७० जणांचा दिवसभरात मृत्यू

तर मंगळवारी दिवसभरात १ हजार ०११ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ६६ हजार ६३३ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

मुंबईत ९६९ नवे रुग्ण, ७० जणांचा दिवसभरात मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. मंगळवारी राज्यात कोरोनाचे २१३ जणांचा बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत मंगळवारी दिवसभरात ९६९ नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत मंगळवारी दिवसभरात ७० जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत मंगळवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ७० रुग्ण दगावले आहेत. तर १३ जुलै रोजी ४७ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी १२ जुलै रोजी एकूण ४४ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, मंगळवारी मुंबईत कोरोनाचे ९६९ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता ९४ हजार ८६३ इतकी झाली आहे. तर मंगळवारी दिवसभरात १ हजार ०११ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ६६ हजार ६३३ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः- अभिनेता वृषभ शहाची उल्लेखनीय कामगिरी

राज्यात आज ४५०० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६७ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ४९  हजार ००७  झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या  ६७४१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख  ७ हजार ६६५ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १३ लाख  ७२ हजार नमुन्यांपैकी २ लाख ६७ हजार ६६५ नमुने पॉझिटिव्ह (१९.४९ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ९८ हजार ८५४ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४२ हजार ३५० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २१३ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४ टक्के एवढा आहे.

हेही वाचाः- अभिनेत्री रेखा यांचा कोरोना चाचणी करण्यास नकार

राज्यात नोंद झालेले २१३ मृत्यू हे मुंबई मनपा-७०, ठाणे-१५, ठाणे मनपा-१५, नवी मुंबई मनपा-८, कल्याण-डोंबिवली मनपा-७, उल्हासनगर मनपा-७, भिवंडी-निजामपूर मनपा-१२, वसई-विरार मनपा-८, रायगड-२, पनवेल मनपा-१, नाशिक-१, नाशिक मनपा-५, अहमदनगर-२, अहमदनगर मनपा-२, धुळे मनपा-२, जळगाव-७, जळगाव मनपा-१, पुणे-६, पुणे मनपा-१०, पिंपरी-चिंचवड मनपा-९, सोलापूर-३, सोलापूर मनपा-३, सातारा-१,सांगली मिरज कुपवाड मनपा-१, रत्नागिरी-२, औरंगाबाद मनपा-४, परभणी-१, परभणी मनपा-१, लातूर-२, नांदेड-३,अकोला-१, बुलढाणा-१, नागपूर मनपा-१, भंडारा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा