बँक अाॅफ महाराष्ट्रच्या एमडींना अटक, डीएसकेंना नियमबाह्य कर्ज दिल्याचा अारोप

  • मुंबई लाइव्ह टीम & नवनाथ भोसले
  • क्राइम

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांना नियमबाह्यपणे कर्ज दिल्याप्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) रवींद्र मराठे यांना बुधवारी पुणे आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली अाहे. याशिवाय बँकेचे कार्यकारी संचालक राजेंद्र गुप्ता, डीएसकेंचे सीए सुनील घाटपांडे, अभियंता राजीव नवासकर,  बँक ऑफ महाराष्ट्राचे माजी व्यवस्थापकीय संचालक सुशील मुनहोत यांना जयपूरमधून तर अहमदाबाद येथून बँक ऑफ महाराष्ट्रचे विभागीय व्यवस्थापक नित्यानंद देशपांडे यांनाही अटक केली अाहे. गुप्ता यांना अाधी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

बनावट कागदपत्रांच्या अाधारे कर्ज 

बँकांचे कर्ज अाणि गुंतवणूकदारांचे पैसे थकवल्याने डीएसके सध्या तुरूंगात अाहेत. अाताच्या कारवाईनंतर त्यांच्यापुढील अडचणी अाणखी वाढण्याची शक्यता अाहे. अटक केलेल्या अधिकाऱ्यांच्या चौकशीतून अाणखी मोठ्या अधिकाऱ्यांची नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात अाहे. डीएसके यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी यालाही  चौकशीसाठी पोलिसांनी बोलावलं आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकाऱ्यांनी अापल्या अधिकाराचा गैरवापर करून बनावट कागदपत्रांच्या अाधारे डीएसकेंना कर्ज मंजूर केल्याचा पोलिसांना संशय अाहे. 


हेही वाचा - 

दिल्लीतील एनबीसीसी वडाळ्यात बांधणार १९८० लक्झरिअस घरं

बिल्डर, ग्राहकांमधील वादावर 'महारेरा'च एकमेव पर्याय!


पुढील बातमी
इतर बातम्या