राज्यातील ४३ कारागृहात १४ हजार कैद्यांची कोरोना चाचणी

महाराष्ट्रात कोरोनाचे संक्रमण (Coronavirus) दिवसेंदिवस वाढत असताना. कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यातील विविध जिल्ह्यात असलेल्या कारागृहातील कैद्यांवरही दिसून आला आहे.  त्यामुळेच कोरोनाचा हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील कारागृह प्रशासनाने राज्यातील ४३ कारागृहांमध्ये १४ हजारहून अधिक कैद्यांची चाचणी (Coronavirus test) करण्यास सुरूवात केली आहे. याचाच परिणाम की काय गेल्या सहा आठवड्यात एकाही कैद्याचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही.

हेही वाचाः- मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी ठाकरे सरकारचे ८ मोठे निर्णय

राज्यातील ४३ कारागृहांमध्ये सध्या सुमारे ३६ हजार कैदी (Prisoners) आहेत.त्यातील १४ हजार २५२ कैद्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. ३१ मेला कारागृहांमध्ये कोरोना पहिला रुग्ण सापडल्यापासून राज्यातील कारागृहांमध्ये कैद्यांच्या चाचण्या मोठ्याप्रमाणात करण्यात आल्या आहेत. कारागृहांमध्ये आतापर्यंत २०११ कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामधील ६ कैद्यांचा मृत्यू झाला आहे. नागपूर कारागृहमध्ये (Nagpur jail) सर्वाधिक म्हणजे १३६६ कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापाठोपाठ मुंबईतील आर्थर रोड कारागृहात (Arthur Road Prison) ९९८ कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. पण आर्थर रोड कारागृहातील  कैद्यांचा आकडा सध्या नियंत्रणात आला आहे.

हेही वाचाः- 'या' कारणास्तव घाटकोपरमधील उद्यान पुन्हा बंद

आर्थर रोड कारागृहात सर्वप्रथम कोरोनाचा रुग्ण सापडला होता. त्यानंतर राज्यभरातील कारागृहांमध्ये कोरोना चाचणी करण्यात आली आहे. सध्या राज्यात २०११ कैद्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती जेल प्रशासनाकडून देण्यात आली आहे. कोरोनाची बाधा झालेल्या कैद्यांना विलगीकरण कक्षात ठेवले जात आहेत. तर कैद्यांसह जैलमध्ये काम करणाऱ्या कर्मचारीही त्यापासून वाचू शकलेले नाहीत. कारागृहात काम करणाऱ्या ४१६ कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कोरोनाची बाधा झाली आहे. तर ४ कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झालेला आहे. राज्यातील कारागृहांमध्ये मोठ्याप्रमाणात चाचण्या सुरू असल्यामुळे बाधीत कैदी सापडत आहेत. मात्र गेल्या सहा आठवड्यात कोरोनामुळे कोणाचाही मृत्यू झालेले नाही

पुढील बातमी
इतर बातम्या