राज्यात १००७ कैद्यांना कोरोनाची लागण

नागपूर कारागृहात सर्वाधिक कैद्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं आहे. त्यापाठोपाठ मुंबईतील आर्थर रोड कारागृहात कोरोनाग्रस्त कैद्यांचा आकडा सर्वाधिक आहे.

राज्यात १००७ कैद्यांना कोरोनाची लागण
SHARES

राज्यातील आतापर्यंत १००७ कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामधील सहा कैद्यांचा मृत्यू झाला आहे. नागपूर कारागृहात सर्वाधिक कैद्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं आहे. त्यापाठोपाठ मुंबईतील आर्थर रोड कारागृहात कोरोनाग्रस्त कैद्यांचा आकडा सर्वाधिक आहे.  

आतापर्यंत ८१४ कैदी उपचारानंतर बरे झाले आहेत. नागपूर मध्यवर्ती कारागृहात २१९ कैद्यांना तर आर्थररोड कारागृहात १८२ कैद्यांना आणि सांगली व अकोल्यातील कारागृहामध्ये अनुक्रमे १४५ व ९९ कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे.  कोरोनामुळे कैद्यांचा मृत्यू झालेल्या कारागृहांमध्ये  नवी मुंबईतील तळोजा कारागृहा येरवडा, धुळे, अमरावती जिल्हा कारागृहाचा समावेश आहे.

आर्थर रोड कारागृहात सर्वप्रथम कोरोनाचा रुग्ण सापडला होता. त्यानंतर राज्यभरातील कारागृहांमध्ये सहा हजार १७७ कैद्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. आर्थर रोड कारागृहातील ७८१ कैद्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. नागपूर येथील ६१६, अकोल्यातील ५६९, औरंगाबादेतील ५१७ व येरवडा कारागृहातील ५०६ कैद्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. याशिवाय राज्यातील कारागृहांमधील २९३ कर्मचा-यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.



हेही वाचा

 पैशांसाठी तिने सख्या अल्पवयीन बहिणीला विकलं, मानखुर्दमधील धक्कादायक प्रकार


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा