‘त्या’ हजार कोटी ड्रग्जच्या तस्करीमागे दिल्ली कनेक्शन

नवीमुंबईच्या न्हावाशेवा बंदर येथे सीमाशुल्क विभाग आणि महसूल गुप्त वार्ता संचलनालयाने दोन दिवसांपूर्वी १९१ किलो हेराँईन हे अंमली पदार्थ जप्त केलं होत. बाजारात या  ड्रग्जची किंमत १ हजार कोटी आहे. आयुर्वेदीक औषधांच्या आड हा तस्करीचा गोरंख धंदा सुरू होता. या प्रकरणी तपास यंत्रणांनी दोघा जणांना अटक केली. मात्र तपासात या तस्करीमागे आता दिल्ली कनेक्शन असल्याचे उघडकीस आले आहे. तपासात अनेक बड्या उद्योगपत्यांची पुढे आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचाः- Raj Thackeray: जीम सुरू करा, बघू काय होतं ते- राज ठाकरे

भारतात मुलेठी या आयुर्वेदी औषधाला मोठी मागणी आहे. हे ओळखून अफगाणिस्तानहून आयुर्वेदीक औषधांच्या आड तस्करांनी १९१ किलो ड्रग्ज पाठवले होते. त्याची कुणकून डीआरआय आणि सीमाशुल्क विभागाला लागली. त्यानुसार दोन्ही तपास यंत्रणांनी नवी मुंबईच्या न्हावाशेवा बंदर येथे छापा  टाकून हे ड्रग्ज पकडलं, अफगाणिस्तानवरून आलेल्या या अंमली पदार्थाची किंमत एक हजार कोटी रुपये  आहे. या प्रकरणात रविवारी तपाय यंत्रणांनी मीनानाथ बोडके व कोंडीभाऊ गुंजल या दोघांना अटक केली. या दोघांच्या चौकशीतून या संपूर्ण प्रकारामागे दिल्लीतील सर्विम एक्पोर्ट कंपनीचे मालक सुरेश भाटीया याच्यासह, मोहम्मद नौमान, महेंद्र निगम यांचा समावेश असल्याचे पुढे आले. निगम लॉजीस्टीकचे काम पाहत होता. तसेच मोहम्मदच्या सांगण्यावरून निगम हा सर्व काम पाहत होता. तर भाटिया या कंपनीचा मालक असून मोहम्मद त्याच्यासाठी काम करत होता. भाटीयाला यापूर्वीही २००८ मध्ये १२०० किलो हशीशच्या तस्करीप्रकरणी शिक्षा झाली होती. शिक्षा पूर्ण केल्यानंतर त्याने पुन्हा अंमली पदार्थांची तस्करी करण्यास सुरूवात केली. याशिवाय मोहम्मदविरोधातही यापूर्वी गुन्हे दाखल आहे.

हेही वाचाः- धारावी मॉडेलची ऑस्ट्रेलियाच्या वृत्तसंस्थेकडूनही दखल

मुलेठीला भारतात मोठी मागणी आहे. त्यामुळे आयुर्वेदीक औषधाच्या नावाने हा ड्रग्सचा साठा भारतात पाठवण्यात आला होता. त्यानुसार शोध मोहिम राबवून हा साठा जप्त करण्यता आला आहे.युर्वेदीक मुलेठीच्या नावाखाली त्यातन हेरॉईन लपवून आणण्यात आले होते. त्याशिवाय काही ड्रग्सचा साठा पाईपमध्येही लवपण्यात आला होता  रविवारी याप्रकरणी मीनानाथ बोडके व कोंडीभाऊ गुंजल याला अटक करण्यात आली होती. बोडके हा नवी मुंबईतील रहिवासी असून लॉजीस्टीक कंपनीत भागिदार आहे. या मागे मोठे रॅकेट असून हा सर्व साठा मुंबई व गोव्यामध्ये जाणार असल्याचा संशय आहे. लॉकडाऊनच्या काळात देशात आतापर्यंत पकडण्यात आलेल्या हा सर्वात मोठा अंमली पदार्थांचा साठा आहे. याप्रकरणाचे तार परदेशापर्यंत जात आहेत. रविवारी रात्री उशीरापर्यंत ही कारवाई सुरू होती.

पुढील बातमी
इतर बातम्या