Drug trafficking कोट्यावधीच्या अंमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी नायझेरियन व्यक्तीला अटक

पोलिसांनी त्याच्याजवळून २ कोटीचे अॅम्फेटॅमाइन हे अंमली पदार्थ जप्त केले आहे.

Drug trafficking कोट्यावधीच्या अंमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी नायझेरियन व्यक्तीला अटक
SHARES

महाराष्ट्रात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सर्व काही ठप्प आहे. मात्र असे असतानाही अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांचा धंदा छुप्या पद्धतीने सुरू आहे. अशाच एका नायझेरियन तस्कराचा आरपीएफ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सनी ओका आयके (४१) असे या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याजवळून २ कोटीचे अॅम्फेटॅमाइन हे अंमली पदार्थ जप्त केले आहे.

हेही वाचाः- Devendra fadnavis: मुंबईत ८०६ रुग्ण आढळल्यावर थोडं बरं वाटलं, पण खरं कारण वेगळंच- फडणवीस

नवी दिल्लीहून एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेसमधून सनी हा प्रवास करत होता. दरम्यान नवी मुंबईतील निलजे आणि तळोजा या रेल्वे स्थानकावर तो उतरला. त्यावेळी गस्तीवर असलेल्या के.एन. शेलार आणि शिवाजी पवार यांना त्याच्या हालचालींवर संशय आल्याने पोलिसांनी त्याची अंग झडती घेतली त्यावेळी त्याच्या बँगेत २ कोटी रुपयांचे अॅम्फेटॅमाइन हे अंमली पदार्थ आढळून आले. हा मूळचा नायझेरियाचा असल्याचे चौकशीत समोर आले आहे. या प्रकरणी मुंबईतील अंमली पदार्थ नियंत्रण विभागाशी (NCB) समन्वय साधून मदत मागितल्याचे मध्य रेल्वेने सांगितले.

हेही वाचाः- वेळापत्रकानुसार लोकल सुरु करा, वैद्यकीय कर्मचाऱ्यांची मागणी

 दरम्यान, आरोपीला आणि त्याच्याकडील जप्त केलेले अंमली पदार्थ एनसीबीच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले असून, नार्कोटिक ड्रग्स ॲण्ड सायकोट्रॉपिक सबटंन्स ॲक्ट अन्वये पुढील कारवाई करण्यात येत आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळात कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही अंमली पदार्थ तस्करांचे कारनामे सुरूच असल्याचे यावरून उघड झाले आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
POLL

कोलकाता विरुद्धचा सामना जिंकून मुंबई इंडियन्स मिळवेल का पहिला विजय ?
Submitting, please wait ...
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा