Advertisement

Exclusive अफगाणिस्तानातून आणलेलं १ हजार कोटींचे हेराॅईन न्हावाशेवा बंदरावर पकडलं

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सर्वत्र लॉकडाऊन सुरू असल्याचे तपास यंत्रणा मुंबईतील कायदा व सुव्यवस्था संभाळण्यात व्यस्त आहेत. हिच संधी साधून ड्रग्ज तस्करांनी आपल्या धंदा छुप्या मार्गाने सुरू ठेवला

Exclusive अफगाणिस्तानातून आणलेलं १ हजार कोटींचे हेराॅईन न्हावाशेवा बंदरावर पकडलं
SHARES

मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमिवर पोलिसांनी सर्वत्र लॉकडाऊन केले असताना देखील ड्रग्ज माफियांचा धंदा सुरूचं आहे. याचचं एक उदाहरण नवीमुंबईच्या न्हावाशेवा बंदरावर पहायला मिळालं. अफगाणिस्तानहून मुंबईच्या न्हावाशेवा बंदरावर आणलेलं ड्रग्ज सीमा शुल्क विभाग व महसुल गुप्त वार्ता संचलनालय(डीआरआय)ने संयुक्तरित्या केलेल्या कारवाई जप्त केलं आहे. तब्बल १९१ किलोचे हेरॉईनचा साठा जप्त करण्यात आला असून त्याची बाजारात किंमत १ हजार कोटी रुपये  इतकी आहे. या प्रकरणात दोघा जणांना तपास अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.


मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सर्वत्र लॉकडाऊन सुरू असल्याचे तपास यंत्रणा मुंबईतील कायदा व सुव्यवस्था  संभाळण्यात व्यस्त आहेत. हिच संधी साधून ड्रग्ज तस्करांनी आपल्या धंदा छुप्या मार्गाने सुरू ठेवला. मात्र रस्त्यावर पोलिसांची नाकेबंदी असल्यामुळे यावेळी आरोपींनी पाण्याच्या मार्ग ड्रग्ज तस्करीसाठी निवडला. आरोपींनी कंटेनरमध्ये मुलेठी या आयुर्वेदीक औषधाच्या नावाखाली कंटेनरमध्ये हेराँईन लपवून आणले. हे ड्रग्ज न्हावाशेवा बंदरावर उतरवण्यात येणार असल्याची कुणकुण डीआरआयला लागली. त्यानुसार डीआरआय व सीमा शुल्क विभागाच्या संयुक्त पथकाने बंदरात शोध मोहिम राबवून रविवारी संशयीत कंटेनर शोधून काढला. आरोपींनी काही ड्रग्सचा साठा पाईपमध्येही लपवला होता. याप्रकरणी पोलिसांनी सध्या दोघांना अटक केली आहे.

हेही वाचाः- अरे बापरे ! राज्यात तासात ३९० जणांचा कोरोनाने मृत्यू, १२ हजार २४८ नवे रुग्ण

मुलेठीला भारतात मोठी मागणी आहे. त्यामुळे आयुर्वेदीक औषधाच्या नावाने हा ड्रग्सचा साठा अफगाणिस्तानहून भारतात पाठवण्यात आला होता. मुंबई आणि गोव्यात प्रामुख्याने हे ड्रग्ज पाठवले जाणार होते. लॉकडाऊनच्या काळात देशात आतापर्यंत पकडण्यात आलेल्या हा सर्वात मोठा अंमली पदार्थांचा साठा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याप्रकरणात पकडण्यात आलेले आरोपी हे फक्त मोहरे असून त्यामागे मोठी साखळी असल्याचा संशय तपास अधिकाऱ्यांना आहे.  रात्री उशिरपर्यंत ही कारवाई सुरू होती.

हेही वाचाः- मुंबईत १०६६ नवे रुग्ण, दिवसभरात ४८ जणांचा कोरोनाने मृत्यू


Read this story in हिंदी
संबंधित विषय