Advertisement

मुंबईत १०६६ नवे रुग्ण, दिवसभरात ४८ जणांचा कोरोनाने मृत्यू

रविवारी दिवसभरात १२३२ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ९६ हजार ५८६ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

मुंबईत १०६६ नवे रुग्ण, दिवसभरात ४८ जणांचा कोरोनाने मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात रविवारी कोरोने ३९० जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. असे असताना मुंबईत मात्र काही प्रमाणात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आल्याचे पहायला मिळते. मुंबईत रविवारी दिवसभरात १०६६ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रविवारी दिवसभरात ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः-‘या’ गुन्ह्यात रॅपर बादशाहची पोलिसांनी केली ४ तास चौकशी

राज्यात कोरोनाच्या वाढत्या मृत्यूवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सध्या कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६८ टक्क्यांवर मृतांच्या एकूण संख्येत रविवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४८ रुग्ण दगावले आहेत. तर ८ आँगस्ट रोजी ५८ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी ७ आँगस्ट रोजी एकूण ४५ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय रविवारी मुंबईत कोरोनाचे १०६६ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता १ लाख २३ हजार ३९७ इतकी झाली आहे. तर रविवारी दिवसभरात १२३२ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ९६ हजार ५८६ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः-'या' कारणांमुळे घाटकोपर ठरतोय कोरोनाचा नवा हॉटस्पॉट

राज्यात आज आतापर्यंतच्या सर्वोच्च संख्येने १३ हजार ३४८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यभरात कोरोनाचे एकूण ३ लाख ५१ हजार ७१० रुग्ण बरे झाले आहेत. आज देखील नविन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून आज  १२ हजार २४८ नविन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६८.२५ टक्के  एवढे आहे. सध्या १ लाख ४५  हजार ५५८  रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. आज देखील राज्यभरात सर्वाधिक ७८ हजार ७० चाचण्या करण्यात आल्या आहेत,  अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २७ लाख २५ हजार ०९० नमुन्यांपैकी ५ लाख १५ हजार ३३२ नमुने पॉझिटिव्ह (१८.९१ टक्के) आले आहेत. राज्यात १० लाख ५८८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३४ हजार ८५७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३९० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.४५ टक्के एवढा आहे.

हेही वाचाः- सुंदर, मनमोहक ब्रम्हकमळ…


आज निदान झालेले १२,२४८ नविन रुग्ण आणि नोंद झालेले ३९० मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१०६६ (४८), ठाणे- २४७ (७), ठाणे मनपा-२१४ (३),नवी मुंबई मनपा-३४८ (९), कल्याण डोंबिवली मनपा-३१९ (१३),उल्हासनगर मनपा-२४ (१), भिवंडी निजामपूर मनपा-२४ (२), मीरा भाईंदर मनपा-११७ (१२), पालघर-२२७ (५), वसई-विरार मनपा-२२७ (५), रायगड-२३९ (५), पनवेल मनपा-२०६ (२), नाशिक-१३६ (३), नाशिक मनपा-८०७ (९), मालेगाव मनपा-२९ (२),अहमदनगर-३९९ (१),अहमदनगर मनपा-१९९ (३), धुळे-९५, धुळे मनपा-३४ (१), जळगाव-२७३ (२४), जळगाव मनपा-५७ (४), नंदूरबार-२६, पुणे- ५१७ (१७), पुणे मनपा-१४३३ (५८), पिंपरी चिंचवड मनपा-१०६६ (२०), सोलापूर-३२७ (७), सोलापूर मनपा-८० (३), सातारा-२५७ (८), कोल्हापूर-३०७ (८), कोल्हापूर मनपा-१३७ (५), सांगली-६९ (१), सांगली मिरज कुपवाड मनपा-२४० (६), सिंधुदूर्ग-२७ (२), रत्नागिरी-१०३ (२), औरंगाबाद-१६५ (७), औरंगाबाद मनपा-११५ (२), जालना-११० (१), हिंगोली-३१ (२), परभणी-२१ (४), परभणी मनपा-५३ (३), लातूर-१७८ (८), लातूर मनपा-१०१ (४), उस्मानाबाद-१६१ (१), बीड-२३५ (१), नांदेड-१४१ (३), नांदेड मनपा-१ (२), अकोला-४२, अकोला मनपा-२६, अमरावती-१४, अमरावती मनपा-५४, यवतमाळ-८८ (१०), बुलढाणा-८६ (३), वाशिम-४२, नागपूर-११६ (३), नागपूर मनपा-४८८ (३७), वर्धा-२३ (१), भंडारा-२, गोंदिया-२८ (१), चंद्रपूर-१८, चंद्रपूर मनपा-१३, गडचिरोली-५ (१), इतर राज्य २३.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा