नक्षली भागातून आलेला ३ कोटींचा गांजा डीआरआयने पकडला

जंगल भागात अंमली पदार्थांची झाडे उगवून त्याची तस्करी करून संघटनेसाठी आर्थिक मदत उभी करण्याचा नवा फंडा नक्षलवाद्यांनी अवलंबला आहे.

नक्षली भागातून आलेला ३ कोटींचा गांजा डीआरआयने पकडला
SHARES

मुंबई डीआरआय (महसूल गुप्तचार विभाग) आणि नागपूर डीआरआय युनिटने नागपूर परिसरात ३ कोटी रुपयांचा गांजा पकडला आहे. या प्रकरणी डीआरआय विभागाने गांजाची तस्करी करणाऱ्या ट्रक चालक सुब्बा राव याला अटक केली आहे. आंध्र प्रदेशहून हा गांजा मुंबईत आणण्याचा प्रयत्न हे तस्कर करत होते. या तस्करीमागे अर्बन नक्षलवादाचा हात असल्याचा संशय डीआरआयच्या अधिकाऱ्यांना आहे.

नक्षलग्रस्त भागाला मिळणारी आर्थिक मदत रोखण्यासाठी प्रशासनाने सर्वच स्तरावरून ताकद लावली असताना जंगल भागात अंमली पदार्थांची झाडे उगवून त्याची तस्करी करून संघटनेसाठी आर्थिक मदत उभी करण्याचा नवा फंडा नक्षलवाद्यांनी अवलंबला आहे.  नुकतंच नक्षलवादी ३ कोटींचा गांजा शहरी भागात तस्करी पाठवणार असल्याची माहीती डीआरआय विभागाला मिळाली होती. त्यानुसार मुंबई डीआरआय विभाग आणि नागपूर विभाग युनिट या माहितीवर समांतर तपास करत होते. शनिवारी एक ट्रक नागपूरहून हा गांजा डिलिव्हरीसाठी जाणार असल्याची माहिती डीआरआय विभागाला मिळाली होती.

त्यानुसार दोन्ही पथक रायपूर- नागपूर महामार्गावरील मौदा टोल बूथवर सापळा रचून बसले होते. त्यावेळी पोलिसांनी आंध्र प्रदेशहून आलेला एक संशयित ट्रकची झाडाझडती घेतली. त्या ट्रकमध्ये वस्तूंच्या आड गांजा लपवण्यात आल्याचं निदर्शनास आलं. यावेळी डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी ट्रक चालक सुब्बा राव याला अटक केली. या तस्करीमागील मुख्य सूत्रधाराचा पोलिस शोध घेत आहेत.



हेही वाचा -

पोलिस कोठडीत तरुणाचा मृत्यू : २ अधिकाऱ्यांसह ३ पोलिस निलंबित

खाकीतली व्यक्ती ठरली देवदूत, निवडणूक अधिकाऱ्याचे वाचवले प्राण




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा