पोलिस कोठडीत तरुणाचा मृत्यू : २ अधिकाऱ्यांसह ३ पोलिस निलंबित

स्थानीय विधायक सहित तमाम बड़े नेताओं ने इस मामले को लेकर पुलिस के आला अधिकारियों से मिल कर दोषी पुलिस वालों पर कार्रवाई करने की मांग की थी।

SHARE

वडाळा ट्रक टर्मिनल पोलिसांनी मारामारीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलेला संशयित आरोपी विजय सिंग (२६) याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी आता ५ पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे. यामध्ये २ पोलिस अधिकारी आणि ३ काॅन्स्टेबलचा समावेश आहे.  विजयसिंगचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाला असल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला होता. वडाळा परिसरातील संतप्त जमावाने पोलिसांविरोधात आंदोलनही केलं होतं. 

आमदार तमिल सेलवन आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपण यांनी दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.  दिवाळीच्या निमित्ताने २७ ऑक्टोबर रोजी वडाळा परिसरात राहणारा विजय हा त्याच्या दोन भावांसोबत त्याच्या होणाऱ्या पत्नीला भेटण्यासाठी रात्री घराबाहेर पडला होता. ट्रक टर्मिनल येथे काही कारणास्तव त्याने दुचाकी थांबवली. त्यावेळी त्याच्या गाडीची लाइट समोर अंधारात असलेल्या एका जोडप्यावर पडल्याने वाद झाला. त्यावेळी समोरील तरुणाने त्याच्या मित्रांना बोलवून विजयला मारहाण करण्यास सुरूवात केली.  

गस्तीवर असलेले पोलिस त्या ठिकाणी आल्यानंतर पोलिसांनी विजय आणि त्याच्या दोन भावांना व समोरील तीन तरुणांना ताब्यात घेतले. पोलिस ठाण्यात आल्यानंतर या तरुणांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर काही वेळातच विजयच्या छातीत दुखायला लागले. त्यामुळे त्याला तात्काळ सायन रुग्ण्यालयात दाखल करण्यात आले.  उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.हेही वाचा -

अक्सा बीचवर बुडून एकाचा मृत्यू, दोघांना वाचवण्यात यश

पोलिस कोठडीत तरुणाचा मृत्यू, नागरिकांकडून आंदोलन
संबंधित विषय
ताज्या बातम्या