पोलिस कोठडीत तरुणाचा मृत्यू, नागरिकांकडून आंदोलन

ट्रक टर्मिनल येथे काही कारणास्तव त्याने दुचाकी थांबवली. त्यावेळी त्याच्या गाडीची लाइट समोर अंधारात असलेल्या एका जोडप्यावर पडल्याने वाद झाला.

पोलिस कोठडीत तरुणाचा मृत्यू, नागरिकांकडून आंदोलन
SHARES

मुंबईच्या वडाळा ट्रक टर्मिनल पोलिसांनी मारामारीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. विजय सिंग (२६) असे या मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांच्या चुकीच्या आणि असहकार्यामुळे विजयचा मृत्यू झाला. त्यामुळे वडाळा परिसरातील संतप्त जमावाने पोलिसांविरोधात आंदोलन केलं.  

दिवाळीच्या निमित्ताने २७ ऑक्टोबर रोजी वडाळा परिसरात राहणारा विजय हा त्याच्या दोन भावांसोबत त्याच्या होणाऱ्या पत्नीला भेटण्यासाठी रात्री घराबाहेर पडला होता. ट्रक टर्मिनल येथे काही कारणास्तव त्याने दुचाकी थांबवली. त्यावेळी त्याच्या गाडीची लाइट समोर अंधारात असलेल्या एका जोडप्यावर पडल्याने वाद झाला. त्यावेळी समोरील तरुणाने त्याच्या मित्रांना बोलवून विजयला मारहाण करण्यास सुरूवात केली.  गस्तीवर असलेले पोलिस त्या ठिकाणी आल्यानंतर पोलिसांनी विजय आणि त्याच्या दोन भावांना व समोरील तीन तरुणांना ताब्यात घेतले. पोलिस ठाण्यात आल्यानंतर या तरुणांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर काही वेळातच विजयच्या छातीत दुखायला लागले. त्यामुळे त्याला तात्काळ सायन रुग्ण्यालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

विजयसिंगचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाला असल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. सध्या विजयचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जेजे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस विभागाचे प्रवक्ते अशोक प्रणय यांनी दिली आहे.



हेही वाचा -

विराट कोहली दहशतवाद्यांच्या रडारवर

उद्योगपती राज कुंद्राची ईडी करणार चौकशी




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा