विराट कोहली दहशतवाद्यांच्या रडारवर

पाकिस्तानातून भारतात दहशतवादी हल्ले करण्याचे कट रचणाऱ्या ऑल इंडिया लष्कर-ए-तोयबा संघटनेनं भारतातील महत्वाच्या व्यक्तींवर हल्ला करण्याचा कट रचला आहे.

SHARE

भारतातील अनेक नामवंत नागरिक ऑल इंडिया लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या हिटलिस्टवर आहे. NIA या राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या हाती लागलेल्या या यादीत भारताच्या क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, सरसंघचालक मोहन भागवत लालकृष्ण अडवाणी, भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा यासह अन्य मान्यवरांची नावे आहेत. एकूण १२ जणांची नावे या यादीत असल्याचं पुढं आलं आहे. 

पाकिस्तानातून भारतात दहशतवादी हल्ले करण्याचे कट रचणाऱ्या ऑल इंडिया लष्कर-ए-तोयबा संघटनेनं भारतातील महत्वाच्या व्यक्तींवर हल्ला करण्याचा कट रचला आहे. या महत्वाच्या व्यक्तींमध्ये भारताच्या क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचेही नाव आहे. त्याचबरोबर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.

केरळ मधील कोझिकोड येथील ऑल इंडिया लष्कर-ए-तोयबा संघटनेने देशभरातील महत्वाच्या व्यक्तींवर हल्ला करण्याचा कट रचल्याची माहिती NIA या राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेला मिळाली. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून त्या महत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेत वाढ झाली आहे. मात्र या यादीत विराट कोहलीचं नाव कोणत्या कारणामुळे आलं याबद्दलची कोणतीही ठोस माहिती सुरक्षा यंत्रणांकडून समोर आलेली नाही.

काश्मीरमध्ये ३७० कलम हटवल्यानंतर पेटून उठलेल्या पाकिस्तानने भारतावर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडली नाही. भारतावर दबाव टाकण्याच्या उददेशाने अशा कुरघोड्या पाकिस्तान वेळोवेळी करत आले आहे. दरम्यान, या हिटलिस्टनंतर विराट कोहलीच्या सुरक्षेत वाढ केली जाण्याची शक्यता आहे.हेही वाचा -

उद्योगपती राज कुंद्राची ईडी करणार चौकशीसंबंधित विषय
ताज्या बातम्या