Coronavirus cases in Maharashtra: 212Mumbai: 85Islampur Sangli: 25Pune: 24Nagpur: 14Pimpri Chinchwad: 12Kalyan: 6Ahmednagar: 5Thane: 5Navi Mumbai: 4Yavatmal: 4Vasai-Virar: 4Satara: 2Panvel: 2Ulhasnagar: 1Aurangabad: 1Ratnagiri: 1Sindudurga: 1Kolhapur: 1Pune Gramin: 1Godiya: 1Jalgoan: 1Palghar: 1Buldhana: 1Nashik: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 8Total Discharged: 35BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

उद्योगपती राज कुंद्राची ईडी करणार चौकशी

इकबाल मिर्चीच्या वादग्रस्त मालमत्ता प्रकरणी ईडीने उद्योगपती आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राला समन्स बजावलं आहे.

उद्योगपती राज कुंद्राची ईडी करणार चौकशी
SHARE

इकबाल मिर्चीच्या वादग्रस्त मालमत्ता प्रकरणी ईडीने (अंमलबजावणी सक्तवसुली संचालनालय) उद्योगपती आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राला समन्स बजावलं आहे. राज कुंद्राला चौकशीसाठी ४ नोव्हेंबरला ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिवसेंदिवस या व्यवहारात अनेक मोठ-मोठ्या व्यक्तींची नावे समोर येऊ लागल्यामुळे राज कुंद्रा यांच्या ईडी चौकशीत काय निष्पन्न होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मिर्चीच्या वरळी येथील सीव्ह्यू, मरियम लॉज आणि राबिया मॅन्शन येथील १५३७ चौरस मीटर मालमत्तेवर ईडीने टाच आणली होती. या प्रकरणात ईडीने मिर्चीचे सहकारी हारून आलम युसूफ, रिंकू देशपांडे आणि रणजितसिंग बिंद्रा यांना अटक केली  होती. या प्रकरणात माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांचीही ईडीने चौकशी केली होती. प्रफुल्ल पटेल यांचे 'सीजे हाऊस'मध्ये दोन फ्लॅट आहेत. २००७ मध्ये 'सीजे हाऊस'च्या बांधकामासाठी एक करार झाला होता. त्यावर प्रफुल्ल पटेल यांची स्वाक्षरी आहे. मुळात प्रफुल्ल पटेल यांच्या कुटुंबाने प्रमोटेट केलेली कंपनी मिलेनियम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिडेट आणि मिर्ची कुटुंबात हा जमिनीचा व्यवहार झाला होता. 

त्या कागदपत्रांवर पटेल यांच्या स्वाक्षरी आहेत. मात्र ही मालमत्ता १९९० रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या देखरेखेखाली एम के मोहम्मद नावाच्या व्यक्तीकडून इकबाल याला विकण्यात आली असल्याचं सांगितलं. २००४ रोजी इकबाल मेमनसोबत जमिनीचा व्यवहार झाला. हा व्यवहार रजिस्ट्रारच्या समोर झाला. सर्व कागदपत्रं जिल्हाधिकाऱ्यांसमोर ठेवण्यात आली होती. जर इकबाल मेमनवर आरोप होते, तर प्रशासनाने हा व्यवहार तेव्हाच रोखायला हवा होता, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी प्रसार माध्यमांना दिली होती.

इकबाल मिर्चीचा साथीदार रंजीत सिंघब्रिंद्रासोबत एक व्यावसायिक करार केला होता. रंजित ब्रिंदा हा इकबाल मिर्चीसाठी काम करतो. आरकेडब्ल्यू डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या तपशिलांची पडताळणी करत असताना ईडीला राज कुंद्रा यांच्या संदर्भातील माहिती आढळली. कारण या पडताळणीत इसेन्शिअल हॉस्पिटॅलिटी लिमिटेड कंपनीचं नाव समोर आलं. ही कंपनी राज कुंद्रा यांच्या मालकीची आहे तर अभिनेत्री शिल्पा शेट्टी या कंपनीची संचालक आहे. दरम्यान, २०११ मध्ये मी एक जमीन आणि कंपनी आरकेडब्ल्यू डेव्हलपर्सना विकली होती. एअरपोर्टच्या जवळ असलेल्या या जमिनीचे सगळे कागद माझ्या सीएने तपासले आहेत. त्यानंतर या कंपनीशी माझा काहीही संबंध नाही असं स्पष्टीकरण राज कुंद्रा यांनी दिलं आहे. मात्र ४ नोव्हेंबर रोजी या व्यवहाराच्या चौकशीसाठी ईडीने राज कुंद्रा यांना समन्स बजावलं आहे.हेही वाचा -

सायबर गुन्ह्यात मुंबई दुसरी
संबंधित विषय
ताज्या बातम्या