खाकीतली व्यक्ती ठरली देवदूत, निवडणूक अधिकाऱ्याचे वाचवले प्राण

मतदान केंद्रावरील अधिकारी जयंत नामदेव डोले EVM मशीन ठीक करण्याचे प्रयत्न करीत होते. माञ मशीन काही केल्या सुरू होत नव्हती. त्यामुळे ताण वाढल्यामुळे जयंत यांना तिथेच हृदयविकाराचा झटका आला.

खाकीतली व्यक्ती ठरली देवदूत, निवडणूक अधिकाऱ्याचे वाचवले प्राण
SHARES
विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रावर कर्तव्यावर असताना पोलिसाने इलेक्शन ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्याचे प्राण वाचवत माणुसकीचे दर्शन घडवले आहे. मलबार हिल येथील मतदान केंद्रावर EVM मशीनमध्ये किरकोळ बिघाड झाल्याने एकच गोंधळ उडाला. तेथील परिस्थितीच्या ताणामुळे एका अधिकाऱ्याला ह्रदयविकाराचा झटका आला. यावेळी पोलिस अधिकाऱ्याने  क्षणाचाही विचार न करता त्याला उचलून पोलिसांच्या गाडीतून रुग्णालयात नेले. वेळीच मदत मिळाल्याने या अधिकाऱ्याचे प्राण वाचले. खाकीतल्या रक्षकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मुंबई पोलिस दलाची मान उंचावली.  

 मुंबईत २१ नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान पार पडले. २४ तारखेला निकाल लागून अनेकांनी हारतुरे घालून मिरवणुकाही काढल्या. मात्र यामध्ये दुर्लक्षित झाले ते, शहराची कायदा व सुव्यवस्था ठिकवून ठेवलेले 'मुंबई पोलिस'. मुंबईत मलबार हिल परिसरात २१  नोव्हेंबर रोजी एक अशी घटना घडली ज्यामुळे जनमानसात मुंबई पोलिसांविषयी आदर वाढला. मलबार हिलच्या चंदारामजी शाळेतील मतदान केंद्रावर  EVM मध्ये तांत्रिक बिघाड झाली. त्यावेळी मतदान केंद्रावरील अधिकारी जयंत नामदेव डोले EVM मशीन ठीक करण्याचे प्रयत्न करीत होते. मात्र मशीन काही केल्या सुरू होत नव्हती. त्यामुळे ताण वाढल्यामुळे जयंत यांना तिथेच हृदयविकाराचा झटका आला.

तेव्हा बंदोबस्तावर हजर असणारे PSI श्री.सूर्यवंशी आणि गिरकर यांनी क्षणाचाही विलंब न करता अाळीपळीने जयंत यांना खांद्यावर उचलून पोलिसांच्या गाडीने रुग्णालयात नेले. जे.जे. रुग्णालयात जयंत त्यांना ICCU वाॅर्ड नंबर 4 मध्ये अॅडमिट केले. डॉक्टरांनी रुग्णाची तपासणी करून उपचार सुरू केले. जयंत यांना लवकर उपचार मिळाले नसते तर ते त्यांच्या जिवावर बेतले असते. प्रसंगावधान दाखवून सुर्यवंशी आणि गिरकरांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक आता सर्वत्र केले जात आहे. 



हेही वाचा -

अक्सा बीचवर बुडून एकाचा मृत्यू, दोघांना वाचवण्यात यश




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा