जसलोक रुग्णालयात विद्यार्थिनीने का केली आत्महत्या?

मुंबईच्या जसलोक रुग्णालयात नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केल्याने एकाच खळबळ उडाली आहे. नारायणी अवस्थी (26) असे या तरुणीचे नाव असून तिने ही टोकाची भूमिका का घेतली हे अद्यापही स्पष्ट होऊ शकलेले नाही.

का केली आत्महत्या?

जसलोक रुग्णालयात तिसऱ्या वर्षाचे बीएससी नर्सिंगचे शिक्षण घेत असलेली नारायणी शनिवारी सकाळी स्वच्छतागृहात गेली. पण बराच वेळ झाला तरी ती बाहेर आली नाही. त्यामुळे तिथल्या इतर विद्यार्थिनींना संशय आला. बाथरूमचा दरवाजा तोडून बघितले असता नारायणी शॉवरला लटकलेल्या अवस्थतेत दिसली.

या घटनेने आम्ही दुखी झालो आहोत. अद्याप नेमके कोणत्या कारणाने तिने हे पाऊल उचलले हे सांगणे कठीण असले तरी अभ्यासात निराशाजनक कामगिरीमुळे ती प्रेशरमध्ये असण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी प्रतिक्रिया जसलोक कॉलेजकडून देण्यात आली आहे.

या प्रकरणी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या तिच्यासोबत शिकणाऱ्या इतर विद्यार्थिनींचे देखील जबाब पोलिसांनी नोंदवून घेतले आहे.

नारायणी अवस्थी ही मूळची उत्तरप्रदेशातील राहणारी असून तिथेच तिने पद्वीचे शिक्षण घेतले होत. त्यानंतर 2014 साली तिने नर्सिंगच्या पद्वीसाठी जसलोक कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होा. तेव्हापासून ती जसलोकच्या हॉस्टेलमध्येच राहात होती.

हेही वाचा - 

आत्महत्या हा पर्याय होऊ शकत नाही!

का केली या भोजपुरी अभिनेत्रीने आत्महत्या?


पुढील बातमी
इतर बातम्या