का केली या भोजपुरी अभिनेत्रीने आत्महत्या?

 Andheri
का केली या भोजपुरी अभिनेत्रीने आत्महत्या?

29 वर्षांची अभिनेत्री अंजली श्रीवास्तव हिने अंधेरीच्या डीएननगर येथील तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिने चार दिवसांपूर्वी आत्महत्या केली असावी, असे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वारंवार फोन करुनही कुणी फोन उचलला नसल्याने अंजलीच्या नातेवाईकांना संशय आला. त्यानंतर त्यांनी बनावट चावीने घराचे कुलूप उघडल्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी अद्याप कोणतीही सुसाईड नोट आढळलेली नाही. त्यामुळे या अभिनेत्रीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले असेल? याविषयी पोलिस तपास करत आहेत.

Loading Comments