आत्महत्या हा पर्याय होऊ शकत नाही!

Mumbai
आत्महत्या हा पर्याय होऊ शकत नाही!
आत्महत्या हा पर्याय होऊ शकत नाही!
आत्महत्या हा पर्याय होऊ शकत नाही!
आत्महत्या हा पर्याय होऊ शकत नाही!
आत्महत्या हा पर्याय होऊ शकत नाही!
See all
मुंबई  -  

'आत्महत्या' हा शब्द ऐकताच अंगावर शहारे येतात. 'आत्महत्या' हा अनपेक्षितपणे येणारा असा मृत्यू आहे, ज्यामुळे हसत्या खेळत्या जीवनाचा अत्यंत दु:खद अंत होतो. तरीही दररोज शेकडो लोकं आपल्या जीवनाचा शेवट आत्महत्येच्या मार्गाने करतात.


आत्महत्येच्या वाढत्या घटना

प्रेमभंग झाल्यामुळे एका 24 वर्षीय तरुणाने नुकतीच वांद्रे-वरळी सी लिंकवरुन समुद्रात उडी मारुन आत्महत्या केली. यापूर्वीदेखील अभियांत्रिकी शाखेच्या एका विद्यार्थ्याने वांद्र्यातील ताज हॉटेलच्या 19 व्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या केली होती. विशेष म्हणजे आत्महत्या करण्याअगोदर या तरुणाने एक व्हीडिओही फेसबुकवर अपलोड केला होता.सर्वेक्षण काय सांगते..

एका फिनिश सर्वेक्षणानुसार, जगात प्रत्येक पाचव्या व्यक्तीच्या मृत्यूचं कारण आत्महत्या हेच असतं. देशाचं भवितव्य ज्यांच्या हातात आहे, अशी तरुण पिढी इतकी हताश का होते? प्रत्येक समस्येचा शेवट आत्महत्याच आहे, असे त्यांना का वाटते? यावर विचार होणे गरजेचे आहे.


भारतात काय स्थिती ?

राष्ट्रीय गुन्हे नोंद विभाग (एनसीआरबी) च्या 2015 मधील आकडेवारीनुसार देशात दर तासाला एक विद्यार्थी आत्महत्या करुन आपले जीवन संपवतो. 2015 मध्ये 8,934 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. 2015 पर्यंत मागील पाच वर्षांत 39,775 विद्यार्थ्यांनी आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपवली.

मेडिकल जर्नल लान्सेटच्या 2012 मधील सर्वेक्षण अहवालानुसार, 15 ते 29 वयोगटातील तरुणांमध्ये आत्महत्येच्या बाबतीत भारत आघाडीवर होता. 2015 मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 1230 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. हा आकडा देशातील एकूण आत्महत्येच्या 14 टक्के (8934) आहे.मुंबईतील स्थिती

मुंबईत 2013, 2014 आणि 2015 मध्ये 3 हजार 637 व्यक्तींनी आत्महत्या केली. त्यात 2 हजार 304 पुरुष आणि 1 हजार 333 महिलांचा समावेश आहे. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये 15 ते 45 वयोगटातील व्यक्तींची संख्या अधिक आहे.


आत्महत्येच्या कारणांचा जन्म

तज्ज्ञांच्या मते, समाजातील प्रत्येक समस्येचा जन्म हा आपल्या घरातच होतो. कौटुंबिक समस्या, आर्थिक विवंचना, त्यातून येणारे नैराश्य ही यामागची महत्त्वाची कारणे. आत्महत्येचा विचार मनात कधी शिरतो हे सांगणे कठीण असले, तरी आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीच्या बदललेल्या व्यवहारावरुन त्याचा अंदाज नक्कीच घेता येतो.लक्षणं स्पष्ट करणारे संवाद...

- मी आत्महत्या करेन
- यापेक्षा मरण परवडले
- जन्मच घेतला नसता तर बरे झाले असते
- मी गेल्यावर माझी आठवण काढाल

आत्महत्या करणारा व्यक्ती स्वत: ला एकटा, हताश मानायला लागतो. बऱ्याचदा तो एकटाच राहतो. स्वत:बद्दलही तो नकारात्मक बोलतो.


कारणे काय?

- तणाव
- अंमली पदार्थांचे सेवन
- यापूर्वी कुणी घरात आत्महत्या केलेली असणे
- बेरोजगारी, गरिबी, भेदभाव, बेघर होणेआत्महत्या कशी थांबवावी ?

- वेळेत डॉक्टरांना भेटा, औषधे घ्या
- दारू आणि अंमली पदार्थांपासून दूर राहा
- इतरांसोबत कायम संवाद ठेवा
- व्यायाम करा
- संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या
- रोज 7 ते 8 तास झोप घ्या
- आवडीच्या गोष्टी करा
- मित्रमंडळी, कुटुंबासोबत मनमोकळा संवाद साधा


आजच्या धावपळीच्या युगात सोशल मीडिया अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य अंग बनले आहे. अनेकजण आपल्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग सोशल मीडियावर टाकतात. पण कुटुंबासोबत अत्यंत आभावानेच संवाद साधतात. कठीण प्रसंगात, समस्येवेळी एकटेपणा येतो. त्यातून निराशेची भावना मनात येते. या सर्वांवर मात करायची झाल्यास मोकळेपणाने संवाद साधणे, मनातल्या गोष्टी इतरांशी शेअर करणे महत्त्वाचे आहे.


डॉ. सागर मुंदडा, मनोवैज्ञानिकहेही वाचा

लष्करी जवानाने का केली आत्महत्या?

या प्रथितयश अभिनेत्रींनी का केली आत्महत्या?


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.