लष्करी जवानाने का केली आत्महत्या?

  Mahalakshmi
  लष्करी जवानाने का केली आत्महत्या?
  मुंबई  -  

  मुंबईच्या महालक्ष्मी येथील एका हॉटेलात लष्करी जवानाने आत्महत्या केली आहे. नीरज कुमार यादव (25) असे या जवानाचे नाव आहे. त्याने आत्महत्या का केली याचा तपास सध्या गावदेवी पोलिस करत आहेत.


  का केली आत्महत्या?

  मूळचा राजस्थानचा असलेला नीरज हा शनिवारी मुंबईत आला होता. तो महालक्ष्मी येथील स्वामी नारायण सेवा आश्रम या हॉटेलात मुक्कामाला होता. असे बोलले जात आहे की, तो अत्यंत चिंतेत होता. काय करावे आणि काय नाही हे त्याला सुचत नव्हते. रविवारी रात्री तो हॉटेलच्या बाहेरही गेला होता. पण काही वेळानंतर तो पुन्हा त्या हॉटेलातील मुक्कामाला असलेल्या खोलीत आला आणि पंख्याला गळफास घेऊन आपले जीवन संपवले. रात्रभर त्याचा मृतदेह पंख्याला लटकून होता.

  सकाळी हॉटेल कर्मचारी त्या खोलीजवळ आला. त्याने दारही ठोठावले. खुप वेळ झाला तरी कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर त्याने बनावट चावीने दार उघडले. तेव्हा नीरजचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांनी याची माहिती गावदेवी पोलिसांना दिली.

  गावदेवी पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट मिळालेली नाही. तपासनंतरच आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होईल असे पोलिसांचे म्हणणे आहे पण वरिष्ठ आणि कुटुंबियांच्या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.  हे देखील वाचा - 

  जळगावच्या शेतकऱ्याची वसईत आत्महत्या, घटना सीसीटीव्हीत कैद

  वसईचा 'वीरू' आत्महत्या करण्यासाठी चढला छतावर!  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.